शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू; दप्तर तरंगताना दिसल्याने उघड झाली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 12:41 IST

- कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे चिमुकल्याचा मृत्यू; दहा फुटाच्या खड्ड्यात चार फुट पाणी; दप्तर तरंगताना दिसल्याने उघड झाली घटना

पुणे घोरपडी गाव येथे बांधण्यात उड्डाणपुलाचे काम सुरु असून त्यासाठी रस्त्यावर येणाऱ्या रेल्वे ट्रॅकवरील खड्डा आहे. खोदला त्या खड्ड्यातील पाण्यात पडून नऊ वर्षीय शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराचा निष्काळजीपणा समोर आला असून, घोरपडीतील नागरिकांनी संताप व्यक्त केला. क्रिश सुभाष अंगरकर (वय ९, रा. खान रोड, गुरुद्वाराजवळील आर्मी सर्व्हट क्वार्टर) असे मृत मुलाचे नाव आहे.

याबाबत पोलिस उपनिरीक्षक भीमराव मांजरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिश सुभाष अंगरकर हा त्याच्या मोठ्या भावासह घोरपडी येथील स्वामी विवेकानंद शाळेत इयत्ता चौथीत शिकत होता. शुक्रवारी नेहमीप्रमाणे ते दोघे भाऊ सकाळी दहाच्या सुमारास शाळेत गेले होते. सायंकाळी मात्र मोठ्या भावाला क्रिश शाळेत दिसला नाही. क्रिश घरी गेला असेल असे समजून मोठा भाऊ एकटाच घरी आला. मात्र क्रिश घरी नव्हताच. रात्र होऊनही तो घरी न आल्याने त्याच्या परिवाराने वानवडी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

शाळेच्या रस्त्यावरच उड्डाणपुलाचे खांब उभारण्यासाठी दहा फूट खोल खड्डे खोदण्यात आले असून त्यात सहा फुटांपर्यंत पाणी साचले होते. शाळेतून येताना याच खड्यात पडून पाण्यात बुडून क्रीशचा मृत्यू झाला.

पाणी उपसून बाहेर काढला मृतदेहशनिवारी सायंकाळी त्या पाण्यावर शाळेची बॅग तरंगताना दिसली. नागरिकांना शंका आल्याने त्यांनी शेजारीच असलेल्या घोरपडी पोलिस चौकीत घटना कळवली. पोलिस उपनिरीक्षक भीमराव मांजरे यांनी अग्निशमन दलाला कळवले. अग्निशामक दलाने खड्ड्यातील पाणी पंपाद्वारे उपसले. त्यानंतर दीड फुटावर मृतदेह आढळला.

पुलाचे बांधकाम करताना कंत्राटदाराने खबरदारीच घेतलेली नाहीपुलाचे बांधकाम अतिशय संथ गतीने सुरू आहे, जेथे पिलर उभारण्यासाठी खड्डा केला आहे तो व्यवस्थित झाकलेला नाही, त्यामुळे कोणीही तेथे सहज जाऊन शकतो. अनेक दिवसांपासून त्यात पाणी साचलेले असल्याने येथे दुर्गंधी असते. खड्डे खोदल्यावर पुरेशी सुरक्षा यंत्रणा उभी केली नाही. त्यामुळे या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसDeathमृत्यूPune Crimeपुणे क्राईम बातम्या