शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

नव्या चाचणी पद्धतीचा फटका; पक्क्या लायसन्ससाठी वेटिंग वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 10:19 IST

शहरात वाहन परवाना काढणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. पुणे आरटीओत दररोज सुमारे पाचशेहून अधिक लर्निंग लायसन्स जारी होतात.

पुणे : परिवहन विभागाने वाहन चालवण्याच्या चाचणीचे नियम अधिक कडक केले आहे. त्यामुळे पुणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) पक्क्या वाहनचालक परवान्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर चाचण्या घेतल्या जात आहेत. मात्र, नव्या मार्गदर्शक सूचनांमुळे पक्क्या लायसन्ससाठी उपलब्ध असलेले चाचणी स्लॉट जवळपास निम्म्याने कमी झाले आहे. परिणामी, पक्क्या लायसन्ससाठी अपॉइंटमेंटचे वेटिंग वाढले असून, अनेकांना चाचणीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

शहरात वाहन परवाना काढणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. पुणे आरटीओत दररोज सुमारे पाचशेहून अधिक लर्निंग लायसन्स जारी होतात. लर्निंग लायसन्सची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर एका महिन्यानंतर उमेदवारांना प्रत्यक्ष वाहनचालक चाचणी द्यावी लागते. दुचाकींसाठी आळंदी रस्त्यावरील आरटीओ कार्यालयात, तर चारचाकी वाहनांसाठी आयडीटीआर येथे चाचणी घेतली जाते. या दोन्ही चाचण्यांसाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट अनिवार्य आहे. दरम्यान, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पुण्यात नव्याने तीन स्वयंचलित वाहन चाचणी केंद्रे उभारण्याचे नियोजन आहे. मात्र, तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या चाचणी केंद्रांवर अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत व कॅमेऱ्यासमोरच चाचण्या घेण्याच्या सूचना परिवहन विभागाने दिल्या आहेत. प्रत्येक चाचणीसाठी ठरावीक वेळ, नियमांचे काटेकोर पालन आणि संपूर्ण प्रक्रिया रेकॉर्ड होणे बंधनकारक करण्यात आले आहे.

चाचणी क्षमतेवर मर्यादा

या नव्या पद्धतीमुळे पुणे आरटीओकडील चाचणी क्षमतेवर मर्यादा आल्या आहेत. पूर्वी दररोज साधारण ७०० ते ८०० पक्क्या लायसन्सचे स्लॉट उपलब्ध होते. मात्र, सध्या ही संख्या घटून सुमारे ३५० पर्यंत आली आहे. त्यामुळे लर्निंग लायसन्स काढलेल्या उमेदवारांना वेळेत स्लॉट मिळणे कठीण झाले आहे. ऑनलाइन बुकिंग सुरू होताच काही मिनिटांत स्लॉट संपत असल्याने अनेक उमेदवारांमध्ये वेटिंगमध्ये राहावे लागत आहे.

परिवहन विभागाच्या आदेशानुसार पक्क्या लायसन्सच्या चाचण्या नव्या नियमांनुसार घेतल्या जात आहेत. सध्या ही प्रक्रिया प्रायोगिक तत्त्वावर सुरू असल्याने स्लॉटची संख्या मर्यादित आहे. मात्र, २९ डिसेंबरपासून दररोज सुमारे ५०० स्लॉट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी सकाळी ६ ते सायंकाळी ४ या वेळेत स्लॉट बुकिंगची सुविधा देण्यात आली असून, ज्यांचे लर्निंग लायसन्सची मुदत संपण्याच्या जवळ आहे, अशा उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.  - स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे 

English
हिंदी सारांश
Web Title : Stricter Driving Tests Cause License Delays in Pune, Waiting Increases

Web Summary : New, stricter driving tests in Pune have reduced license slots, leading to longer waiting times for permanent driving licenses. The RTO is working to increase slots to 500 daily by December 29th and prioritize those expiring soon.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे