शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

माउलींच्या पायीवारी पालखी सोहळ्याचे वेळापत्रक लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 13:00 IST

- आषाढी वारी : पुणे मुक्कामातील सोयी-सुविधांचा पेच; चर्चेनंतर १ मे रोजी अंतिम निर्णय

आळंदी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे बहुप्रतीक्षित वेळापत्रक सोमवारी (दि. १३) जाहीर होणार होते. मात्र, काही तांत्रिक आणि नियोजनाच्या कारणास्तव हे वेळापत्रक लांबणीवर टाकण्याचा निर्णय श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीने घेतला आहे. पुण्यातील भवानी पेठ येथील विठ्ठल मंदिर मुक्कामाच्या ठिकाणी सोयी-सुविधांबाबत अद्याप ठोस लेखी प्रस्ताव प्राप्त न झाल्याने संस्थानने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

संस्थानने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, पालखी सोहळ्याचे वेळापत्रक १३ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार होते. परंतु, ९ आणि १० जुलै रोजी पुणे मुक्कामादरम्यान पालखी विठ्ठल मंदिर, भवानी पेठ येथे राहणार आहे. या ठिकाणच्या सुविधा, उपाययोजना आणि प्रशासकीय समन्वयाबाबत संस्थानने काही सूचना केल्या होत्या. या संदर्भात १२ एप्रिलपर्यंत कोणतीही अधिकृत हमी देणारा प्रस्ताव मंदिर प्रशासनाकडून प्राप्त झालेला नाही. यामुळे वारकरी समाजाला सोयी - सुविधांची खात्री देता येत नसल्याचे कारण सांगत वेळापत्रक प्रसिद्ध करणे तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.

या गंभीर विषयावर तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, भवानी पेठ विठ्ठल मंदिर विश्वस्त, दिंडी संघटनांचे पदाधिकारी आणि संस्थानचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पुढील आठ दिवसांत आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत होणाऱ्या चर्चेनंतर जो प्रस्ताव समोर येईल, तो २६ एप्रिल रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या बैठकीत वारकरी समाजासमोर चर्चेसाठी ठेवला जाईल. या सर्व प्रक्रियेनंतर अखेर १ मे २०२६ रोजी आळंदी येथे आषाढी वारीची अधिकृत कार्यक्रम पत्रिका आणि वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याची माहिती संस्थान समितीच्या वतीने प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजनाथ, चैतन्य महाराज लोंढे, ॲड. रोहिणी पवार, पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mauli's Palkhi Procession Schedule Postponed Due to Logistical Issues

Web Summary : The much-awaited schedule for Shri Dnyaneshwar Maharaj's Palkhi procession is delayed. Lack of confirmed facilities at Pune's Vitthal Mandir is the reason. A meeting will address concerns, with the official schedule announced May 1st.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे