शहरं
Join us  
Trending Stories
1
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
2
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
3
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
4
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
5
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
6
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
9
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
10
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
11
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
12
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
13
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
14
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
15
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
16
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
17
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
18
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
19
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
20
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी सक्तीचे होणार भूसंपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 11:58 IST

- २५ मेपर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट; दोन दिवसांत सक्तीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू

पुणे : बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी महापालिकेने ‘सक्तीने भूसंपादन’ करण्यात येणार असून ही प्रक्रिया पुढील दोन दिवसांत सुरू करून संपूर्ण प्रक्रिया २५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती भूसंपादन विभागाचे उपायुक्त निखिल मोरे यांनी दिली.

कात्रज-कोंढवा रस्त्यावरून सोलापूर, सासवड, फलटण, मुंबई, कोकण, साताऱ्याकडे जड आणि हलक्या वाहनांची मोठ्याप्रमाणात ये-जा होते. शिवाय रस्त्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढले आहे. परिणामी या रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीत वाढ होऊन वाहतूककोंडी होते. ही वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने कात्रज-कोंढवा (खडी मशीन चौक) या दरम्यानच्या रस्त्याचे ८४ मीटर रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार निविदाही काढण्यात आली. मात्र, वाढीव निविदेवरून हा रस्ता सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला.

दरम्यान, कोणत्याही प्रकल्पासाठी किमान ८० टक्के भूसंपादन झाल्याशिवाय प्रशासनाकडून त्याचे काम सुरू केले जात नाही. मात्र, निम्मेही भूसंपादन झालेले नसताना केवळ २०१९ ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर आचारसंहिता लागण्यापूर्वी घाई घाईने भूमिपूजन करण्यात आले.
महापालिका प्रशासनाने या रस्त्यासाठी ४५० कोटी रुपयांचा टीडीआर दिला. उर्वरित जागेसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, जागा मालकांना टीडीआर नाकारून रोख मोबदल्याची मागणी केली आहे. त्यामुळे उर्वरित भूसंपादनासाठी ७५० कोटी रुपयाची गरज आहे. दुसरीकडे काही बांधकामांना यापूर्वीच प्रशासनाने परवानग्या दिल्याने येथील नागरिक जागा देण्यास तयार नाहीत. रस्त्याचे काम तुकड्या तुकड्यामध्ये झाले.

भूसंपादनाचा हा प्रश्न सोडवण्यासाठी शहरी भूसंपादन कायद्यानुसार जागा मालकांना बाजार भावाच्या दुप्पट मोबदला देण्यात येणार आहे. त्यासाठी कात्रज, कोंढवा आणि कोंढवा औद्योगिक, असे तीन विभाग करून दर निश्चित करण्यात आले आहेत. कात्रजमध्ये २५,६६७ रुपये, कोंढव्यात २४,६५७ रुपये आणि औद्योगिक भागात १९,६९८ रुपये प्रति चौरस मीटर दर ठरविण्यात आला आहे. सात वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचे भूसंपादन पूर्ण करण्यासाठी अखेर महापालिकेने सक्तीचे भूसंपादन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया पुढील दोन दिवसांत सुरू करून संपूर्ण प्रक्रिया दि. २५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मोरे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : For Katraj-Kondhwa Road, Compulsory Land Acquisition Will Be Implemented

Web Summary : Pune Municipal Corporation will forcibly acquire land for the Katraj-Kondhwa road widening. The process aims to be completed by May 25, offering double market value compensation to landowners in Katraj, Kondhwa, and Kondhwa industrial areas.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेroad safetyरस्ते सुरक्षा