केंद्रीय विद्यालयाची प्रवेशप्रक्रिया सुरू; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 09:44 IST2026-03-22T09:44:03+5:302026-03-22T09:44:15+5:30

इयत्ता दुसरी आणि त्यापुढील वर्गांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

pune news kendriya Vidyalaya admission process begins; Last date to apply online is April 2 | केंद्रीय विद्यालयाची प्रवेशप्रक्रिया सुरू; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

केंद्रीय विद्यालयाची प्रवेशप्रक्रिया सुरू; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

पुणे : केंद्रीय विद्यालय संघटनेने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या प्रवेशाची नियमावली आणि अधिकृत वेळापत्रक जाहीर केली आहे. त्यानुसार इयत्ता पहिली आणि बालवाटिका (नर्सरी, ज्युनियर केजी, सीनिअर केजी) प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया शुक्रवार (दि. २०) पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख २ एप्रिल २०२६ पर्यंत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. इयत्ता दुसरी आणि त्यापुढील वर्गांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

रिक्त जागांच्या उपलब्धतेनुसार ही प्रक्रिया दि. २ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान राबवली जाईल. नवीन सत्राची सुरुवात इयत्ता दुसरी व त्यापुढील वर्गांचे शिक्षण १ एप्रिल २०२६ पासून, तर पहिली व बालवाटिकाचे वर्ग २० एप्रिल २०२६ पासून सुरू होतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यात प्रवेश घेण्याकरिता वयाेमर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार नर्सरीसाठी पाल्याचे वय ३ ते ४ वर्ष, ज्युनियर केजीसाठी ४ ते ५ वर्षे आणि सीनिअर केजीसाठी ५ ते ६ वर्षे वयाची अट असणार आहे.

इयत्ता पहिलीसाठी ६ वर्षे पूर्ण हाेणे आवश्यक आहे. याकरिता ३१ मार्च २०२६ ही तारीख ग्राह्य धरण्यात येणार आहे. याचबराेबर पाल्याचा जन्म दाखला, निवासाचा दाखला, सर्व्हिस सर्टिफिकेट (सरकारी कर्मचाऱ्यांसाठी), जातीचा दाखला (लागू असल्यास), अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास), ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी रेशन कार्ड किंवा बीपीएल कार्ड आवश्यक आहे.

Web Title : केंद्रीय विद्यालय में प्रवेश शुरू; 2 अप्रैल तक ऑनलाइन आवेदन करें

Web Summary : केंद्रीय विद्यालय संगठन ने 2026-27 के लिए प्रवेश शुरू किए। कक्षा 1 और बालवाटिका के लिए 2 अप्रैल तक ऑनलाइन आवेदन करें। उच्च कक्षाओं के लिए रिक्तियों के आधार पर ऑफलाइन आवेदन स्वीकार किए जाएंगे। जन्म प्रमाण पत्र और निवास प्रमाण जैसे दस्तावेजों की आवश्यकता है।

Web Title : Kendriya Vidyalaya Admissions Open; Apply Online by April 2nd

Web Summary : Kendriya Vidyalaya Sangathan starts admissions for 2026-27. Online applications for Class 1 and kindergarten open until April 2nd. Offline applications accepted for higher classes based on availability. Age criteria and required documents like birth certificate and residence proof are specified.