किती भाग्य आहे, सर्वांनाच असं वाटतं ही व्यक्ती आपल्याकडे हवी; जयंत पाटलांच्या पक्षबदलाच्या चर्चेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 16:56 IST2025-03-14T16:53:59+5:302025-03-14T16:56:32+5:30
किती भाग्य आहे, सर्वांनाच असं वाटतं ही व्यक्ती आपल्याकडे हवी; जयंत पाटलांच्या पक्षबदलाच्या चर्चेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या...

किती भाग्य आहे, सर्वांनाच असं वाटतं ही व्यक्ती आपल्याकडे हवी; जयंत पाटलांच्या पक्षबदलाच्या चर्चेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या...
बारामती - किती भाग्य आहे ,बघा की सर्वांनाच असं वाटतं की,ही व्यक्ती आपल्याकडे हवी, असं प्रत्येकाला वाटणं, ही केवढी मोठी बाब आहे. असे वकत्व्य जयंत पाटील यांच्या पक्षबदलाच्या चर्चेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आमदार जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी येथील कृषि विज्ञान केंद्रात एकत्रित आले होते. त्यांनी बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रातील ‘अेआय’ तंत्रज्ञानावर केलेली ऊसलागवड,ड्रोनद्वारे पिकांवर औषध फवारणी आदी प्रयोगांची पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी पत्रकारांची संवाद साधला. पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी हे वक्तव्य केले आहे.जयंत पाटील यांच्याबाबत मंत्री विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर विचारले असता सुळे म्हणाल्या की, ते आमचे विरोधक आहेत ते बोलतच राहणार. 'बुरा ना मानो होली है' अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या लग्न बंधनाचे फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर टाकले होते. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत प्रतिक्रिया दिली आहे. सुळे म्हणाल्या की, जयच लग्न ठरतंय आम्हाला आनंद होत आहे. ऋतुजा ही येणारी आमची सून व जय हे ज्येष्ठ नेते शरद पवार व प्रतिभा काकी यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी माझ्या बहिणी व वहिन्या बरोबर होत्या,असे सुळे म्हणाल्या.