ऑफिसच्या व्हाट्सअप ग्रुपवर फोटो टाकण्याची हिम्मत कशी केलीस? म्हणत कर्मचाऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 16:04 IST2026-02-24T16:02:02+5:302026-02-24T16:04:55+5:30

कंपनीत मोबाईल फोन वापराच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता.

pune news how dare you post a photo on a group? Employee attacked with an iron rod | ऑफिसच्या व्हाट्सअप ग्रुपवर फोटो टाकण्याची हिम्मत कशी केलीस? म्हणत कर्मचाऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला

ऑफिसच्या व्हाट्सअप ग्रुपवर फोटो टाकण्याची हिम्मत कशी केलीस? म्हणत कर्मचाऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला

राजगुरुनगर (ता. खेड) - कंपनीच्या व्हाट्सअप ग्रुपवर फोटो व्हायरल केल्याच्या कारणावरून एका कर्मचाऱ्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमीचे नाव विशाल हिरामण तोत्रे (मूळ रा. वडगाव पाटोळे, सध्या रा. राक्षेवाडी, ता. खेड) असे असून, आरोपी अक्षय भगवान भांबुरे (रा. ढोरे भांबुरवाडी, ता. खेड) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीत मोबाईल फोन वापराच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. फिर्यादी विशाल तोत्रे यांनी कंपनीच्या एचआर मॅनेजरकडे तसेच कंपनीच्या व्हाट्सअप ग्रुपवर आरोपी अक्षय भांबुरे यांचे फोटो शेअर केले होते.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या आरोपीने विशाल तोत्रे यांना अडवून लोखंडी रॉडने डोक्यावर व हाताच्या कोपरावर वार केले. या हल्ल्यात तोत्रे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर आरोपीने फिर्यादीला धमकावत, “यापुढे माझी तक्रार केली तर तुला जिवे ठार मारेन,” अशी धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर खेड पोलिसांनी आरोपीविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. परिसरात या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title : व्हाट्सएप फोटो पर कर्मचारी पर लोहे की रॉड से हमला।

Web Summary : कंपनी के व्हाट्सएप ग्रुप पर तस्वीरें साझा करने पर एक कर्मचारी पर लोहे की रॉड से हमला किया गया। घटना राजगुरुनगर, खेड़ में हुई। पुलिस ने आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर लिया है, जिसने पीड़ित को धमकी भी दी।

Web Title : WhatsApp photo leads to iron rod attack on employee.

Web Summary : An employee was attacked with an iron rod for sharing photos on a company WhatsApp group. The incident occurred in Rajgurunagar, Khed. Police have registered a case against the accused, who also threatened the victim.