रावणगावात हृदयद्रावक घटना;पती-पत्नीचा संसार क्षणात उध्वस्त; पत्नीचा खून करून पतीने उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 15:01 IST2025-10-02T15:00:54+5:302025-10-02T15:01:30+5:30
दोघेही पती-पत्नी शेती करून उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या मागे दोन मुले आहेत.

रावणगावात हृदयद्रावक घटना;पती-पत्नीचा संसार क्षणात उध्वस्त; पत्नीचा खून करून पतीने उचललं टोकाचं पाऊल
दौंड - रावणगाव (ता. दौंड) येथे मध्यरात्रीच्या सुमारास हृदयद्रावक घटना घडली. पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला आणि काही वेळातच स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. खून झालेल्या महिलेचे नाव जयश्री गावडे (वय ४५) असून आत्महत्या करणारे पती अशोक गावडे (वय ५०) आहेत. ही घटना बुधवार (दि.१) रोजी घडली.
दोघेही पती-पत्नी शेती करून उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या मागे दोन मुले आहेत. पत्नीचा खून केल्यानंतर अशोक गावडे यांनी राहत्या घरात सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. याबाबत माहिती पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली.