शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

हडपसर मतदारसंघाच्या आमदारांकडून विकासकामांकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 17:29 IST

- अनेक महत्त्वाचे प्रकल्प प्रलंबित : नागरिकांमध्ये संताप

- संतोष गाजरेकात्रज : नोव्हेंबर २०२४ मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघांमधून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे चेतन तुपे हे विजयी झाले. परंतु निवडणुकीच्या काळात कोपऱ्या-कोपऱ्यात फिरणारे आणि 'तुमचा सेवक' म्हणून मते मागणाऱ्या लोकप्रतिनिधींना आता मतदारसंघाचा विसर पडला आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा हडपसर मतदारसंघातील दक्षिण पुण्यातील नागरिकांना येत आहे. मतदारसंघात अनेक महत्त्वाचे प्रकल्प प्रलंबित असताना, आमदारांनी मात्र इकडे पाठ फिरवली आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.हडपसर मतदारसंघात येणाऱ्या महत्त्वाच्या असणाऱ्या कात्रज-कोंढवा रोड सारख्या प्रकल्पालाही आमदार चेतन तुपे यांनी आजवर किती वेळा भेट दिली, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे. तसेच तुपे हे मतदारसंघातील वाहतूककोंडी, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधा, स्मशानभूमीसारखे प्रश्न गंभीर बनले असताना आमदार फिरकलेच नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.अनेक मोठ्या प्रकल्पांच्या मंजुरीच्या घोषणा झाल्या, कागदावर आराखडे तयार झाले, मात्र प्रत्यक्षात कामाचा वेग शून्य आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या प्रकल्पांची सद्यस्थिती काय आहे किंवा त्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत, मनपाचे आयुक्त, वरिष्ठ अधिकारी कात्रज कोंढवा रोड असो किंवा इतर ठिकाणी येतात मात्र त्यावेळी आमदार कुठे असतात? याबाबत आमदारांनी काय केले असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यावेळी आमदार जातात कुठे ?मनपाचे आयुक्त, अधिकारी कात्रज कोंढवा रोड असो किंवा अन्य ठिकाणीच्या कामाला येतात. मात्र त्यावेळी आमदार कुठे असतात ? याबाबत आमदारांनी काय केले असा सवाल केला जात आहे.

 २०२४ च्या निवडणुकीनंतर नागरिकांना खरेतर अपेक्षा होती की विधानसभा आमदार आणि विधान परिषद आमदार यांच्या जोडीने या भागातील प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळेल. पण आजही कात्रज-कोंढवा रोड, कोंढवा बुद्रुकची स्मशानभूमी या भागातील पाण्याचा, विजेचा प्रश्न कायम असून जनतेला उत्तरदायी असणाऱ्या विधानसभा आमदारांचे या भागात न होणारे दर्शन आश्चर्यचकित करणारे आणि दोन्ही आमदारांनी मतदारसंघ वाटून घेतल्याच्या चर्चेला पुष्टी देणारे आहे. यामध्ये एक मात्र नक्की. दोन आमदार असतानाही नागरिकांचा होणारा अपेक्षाभंग दुर्दैवी आहे.  - दादाश्री कामठे, अध्यक्ष, कोंढवा-कात्रज काँग्रेस ब्लॉक कमिटी 

कात्रज - कोंढवा रोड प्रकल्प हा आमचे सहकारी विधान परिषदेचे आमदार पाहत आहेत. ते त्या ठिकाणी लक्ष देत आहेत. याबाबत आमचं रोज बोलणं होतं. माझी कामे मी करत असतो, नगरसेवकांच्या कामात मी जात नाही. अजित पवार यांच्या समवेत मी रस्त्याची पाहणी केली होती. अधिवेशनात मी प्रश्न विचारला, आमदार म्हणून माझं जे कर्तव्य आहे ते मी पार पडतोय. स्वारगेट ते कात्रज मेट्रोसाठी मी प्रयत्न केले. - चेतन तुपे, आमदार, हडपसर विधानसभा

English
हिंदी सारांश
Web Title : Hadapsar MLA Neglects Development Work, Angering Constituents

Web Summary : Hadapsar constituents are angry as MLA Chetan Tupe neglects development projects. Key issues like Katraj-Kondhwa Road, water supply, and traffic congestion remain unresolved. Citizens question his absence and lack of action despite project delays. MLA claims he is fulfilling his duties.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे