Video : महापालिका कर्मचारी वसाहतीच्या मीटर रूमला आग; आंबिल ओढा कॉलनीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 20:48 IST2025-11-15T20:39:54+5:302025-11-15T20:48:09+5:30
आग विझविण्यात विलंब झाला तर मोठी दुर्घटना घडू शकते, त्यामुळे प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे

Video : महापालिका कर्मचारी वसाहतीच्या मीटर रूमला आग; आंबिल ओढा कॉलनीतील घटना
पुणे : आंबील ओढा कॉलनी-साने गुरुजीनगर येथील पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमधील मीटर रूमला शनिवारी सकाळी आग लागली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.
पुणे : आंबील ओढा कॉलनी-साने गुरुजीनगर येथील पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमधील मीटर रूमला शनिवारी सकाळी आग लागली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. pic.twitter.com/SSQzoE0QyC
— Lokmat (@lokmat) November 15, 2025
साने गुरुजी वसाहतीमध्ये यापूर्वी आगीच्या तीन दुर्घटना घडल्या आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा चौकशी झालेली नसल्याचा आरोप रहिवासी करत आहेत. आग विझविण्यात विलंब झाला तर मोठी दुर्घटना घडू शकते, त्यामुळे प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.