अखेर रवींद्र धंगेकर यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी सोपवली मोठी जबाबदारी; पुणे महानगर प्रमुख पदी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 19:00 IST2025-05-20T18:59:41+5:302025-05-20T19:00:29+5:30

धंगेकर हे कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून भाजपचा बालेकिल्ला फोडणारे एकमेव नेते ठरले होते.

pune news Finally Eknath Shinde entrusted a big responsibility to Ravindra Dhangekar Selected as Pune Metropolitan City Chief | अखेर रवींद्र धंगेकर यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी सोपवली मोठी जबाबदारी; पुणे महानगर प्रमुख पदी निवड

अखेर रवींद्र धंगेकर यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी सोपवली मोठी जबाबदारी; पुणे महानगर प्रमुख पदी निवड

- किरण शिंदे

पुणे -
 राजकारणात सतत चर्चेत राहणारे रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशानंतरच राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती की धंगेकर यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी सोपवली जाणार. अखेर या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासातील नेते म्हणून ओळख निर्माण करत रवींद्र धंगेकर यांची शिवसेना (शिंदे गट) च्या पुणे महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती एक वर्षासाठी आहे. ही नियुक्ती येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

महानगर प्रमुख म्हणून काय जबाबदारी?

पुणे महानगर प्रमुखपद ही शिंदे गटासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. संपूर्ण पुणे शहरातील संघटनात्मक बांधणी, प्रचार, निवडणूक तयारी आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्व घडवण्याची जबाबदारी या पदावर असलेल्या व्यक्तीवर असेल.

धंगेकर हे कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून भाजपचा बालेकिल्ला फोडणारे एकमेव नेते ठरले होते. त्यांच्या या विजयामुळेच त्यांना शिंदे गटाकडून महत्त्वाची भूमिका मिळण्याची शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती.

पक्षातील रणनीतीचे नवे समीकरण

या नियुक्तीमुळे शिवसेनेच्या शिंदे गटाने पुण्यात आपली ताकद वाढवण्याचा स्पष्ट संकेत दिला आहे. रवींद्र धंगेकर यांच्या अनुभवाचा फायदा पक्ष आगामी महापालिका आणि इतर स्थानिक निवडणुकांमध्ये घेणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शहर संघटना नव्याने सज्ज होणार असून, पक्षाला पुन्हा एकदा पुण्यात मजबूत स्थान मिळवून देण्यासाठी ही योजना आखली गेली आहे. ही नियुक्ती धंगेकर यांच्या कारकिर्दीतला महत्त्वाचा टप्पा असून, येत्या काळात त्यांच्या कार्यपद्धतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असेल.

Web Title: pune news Finally Eknath Shinde entrusted a big responsibility to Ravindra Dhangekar Selected as Pune Metropolitan City Chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.