राज्यातील अकरावीच्या प्रवेशासाठी अंतिम विशेष फेरी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 17:07 IST2025-10-03T17:06:45+5:302025-10-03T17:07:30+5:30

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ३० सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत या विशेष फेरीला मान्यता देण्यात आली असून, महत्त्वाचे नियम व वेळापत्रक निश्चित करण्यात आले

pune news final special round announced for 11th class admission in the state | राज्यातील अकरावीच्या प्रवेशासाठी अंतिम विशेष फेरी जाहीर

राज्यातील अकरावीच्या प्रवेशासाठी अंतिम विशेष फेरी जाहीर

पुणे : राज्यभर इयत्ता अकरावीचे प्रवेश आता पूर्णपणे केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. दहा फेऱ्या झाल्यानंतरही अतिवृष्टी व पुरामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रलंबित राहिले. अशा विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी म्हणून अंतिम विशेष फेरी घेण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ३० सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत या विशेष फेरीला मान्यता देण्यात आली असून, महत्त्वाचे नियम व वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहेत. ही विशेष फेरी ४ ऑक्टोबर २०२५ सकाळी १० पासून ते ६ ऑक्टोबर २०२५ दुपारी ३ वाजेपर्यंत विद्यार्थी नवीन नोंदणी, प्राधान्यक्रम भरणे किंवा बदल करू शकतील. या फेरीत विद्यार्थ्यांना नोंदणीसह विकल्प भरणे अनिवार्य आहे. विकल्प भरल्यानंतरही जागा न मिळाल्यास रिक्त जागांच्या आधारावर पुन्हा विकल्प बदलण्याची परवानगी दिली जाईल.

मात्र, एकदा महाविद्यालय मिळाल्यानंतर पुढे विकल्प बदलणे शक्य होणार नाही. प्रत्येक टप्प्यानंतर विद्यार्थ्यांना एसएमएस व संकेतस्थळाद्वारे माहिती मिळेल. सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर गुणवत्तेनुसार अलॉटमेंट जाहीर केले जाईल. कनिष्ठ महाविद्यालयातील प्रत्यक्ष प्रवेशासाठीचे वेळापत्रक ७ ऑक्टोबरनंतर प्रसिद्ध केले जाईल. विद्यार्थी व पालकांनी ही अंतिम संधी न गमावता तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी, तसेच कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवावी, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.

Web Title : महाराष्ट्र कक्षा XI प्रवेश के लिए अंतिम विशेष दौर घोषित

Web Summary : महाराष्ट्र में कक्षा XI में प्रवेश के लिए लंबित मामलों के कारण अंतिम विशेष दौर की घोषणा की गई। पंजीकरण 4-6 अक्टूबर तक खुला है। छात्रों को विकल्प भरने होंगे। आवंटन के बाद, परिवर्तन असंभव हैं। विवरण एसएमएस और वेबसाइट के माध्यम से उपलब्ध हैं। इस आखिरी मौके को न चूकें!

Web Title : Final Special Round Announced for Maharashtra Class XI Admissions

Web Summary : Maharashtra announces a final special round for Class XI admissions due to pending cases. Registration is open October 4-6. Students must fill options. After allotment, changes are impossible. Details are available via SMS and website. Don't miss this last chance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.