शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगड संवर्धनात ऐतिहासिक तोफगोळ्याचा शोध; कल्याण दरवाजाच्या बुरुजात दडलेली रणसंग्रामाची नवी साक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 10:26 IST

सिंहगड संवर्धनात ऐतिहासिक तोफगोळ्याचा शोध; कल्याण दरवाजाच्या बुरुजात दडलेली रणसंग्रामाची नवी साक्ष

खडकवासला : सिंहगडावर सुरू असलेल्या गडसंवर्धनाच्या कामात पुन्हा एकदा इतिहासाच्या पाऊलखुणा आढळल्या आहेत. कल्याण दरवाज्याजवळील ढासळलेल्या बुरुजात साधारणतः ४-५ इंच व्यासाचा प्राचीन तोफगोळा आढळून आला असून, हा अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा मानला जातोय.

नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या सिंहगडावर भूतकाळात अनेक लढाया झाल्या. त्याचे पुरावे, म्हणून या आधीही गडाच्या तटबंदीचे बांधकाम करताना जुने तोफगोळे, तोफा आणि अन्य युद्धसामग्री सापडल्याची नोंद आहे. नव्याने सापडलेला हा तोफगोळा या इतिहासाला अधिक अधोरेखित करणारा शिवकालीन रणसंग्रामाची साक्ष आहे.

संवर्धनातून मिळणार इतिहासाला उजाळा

सध्या राज्य पुरातत्व खात्याच्या वतीने कल्याण दरवाज्याचे संवर्धन ऐतिहासिक शैलीत वेगाने सुरू आहे. तटबंदीचे पारंपरिक बांधकाम, दगडी रचना आणि मूळ आराखड्याचा अभ्यास करताना इतिहासकालीन रणसंग्रामाच्या अनेक खुणासमोर येऊ लागल्या आहेत. जुन्या तटबंदीमध्ये अडकलेले शस्त्रसामग्रीचे अवशेष हे गडावर ताबा मिळविण्याच्या संघर्षातून झालेल्या लढायांचे जिवंत पुरावेच ठरत आहेत. या तोफगोळ्याचा शोध हा फक्त पुरातन अवशेष सापडण्यापुरता मर्यादित नसून सिंहगडाच्या लढायांच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचा आहे.

गड संवर्धनामुळे अशा ऐतिहासिक खुणासमोर येत असल्याने शिवकालीन, तसेच ब्रिटिशकालीन युद्धकलेचा पुरावे उजेडात येत आहे. सिंहगडाचा इतिहास अधिक समृद्ध, अभ्यासनीय आणि ठोस पुराव्यांसह जगासमोर उभा राहण्यास हे मोठे पाऊल ठरणार आहे. शिवकालीन युद्धतंत्र, तोफखाना आणि रणकौशल्य समजून घेण्यासाठी असे पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरतात.

कल्याण दरवाजाच्या बुरुजात घट्ट रुतलेला हा तोफगोळा काळजीपूर्वक बाहेर काढून त्याचा आकार, धातू, वजन, तोफेची दिशा आदी बाबींचे विश्लेषण करून त्याची माहिती लवकरच प्रसिद्ध करू -  डॉ. विलास वाहणे, सहायक संचालक, राज्य पुरातत्त्व विभाग 

इतिहासात सिंहगडावर तोफगोळ्यांचा मारा करण्याच्या दोन घटना प्रसिद्ध आहेत. पहिली घटना म्हणजे डिसेंबर १७०२ साली औरंगजेबाच्या सैन्याने सिंहगडाला वेढा घातला होता, जो एप्रिल १७०३ पर्यंत होता. यादरम्यान गडावर मोगल सैन्याने तोफगोळ्यांचा मारा केल्याचे उल्लेख मिळतात. दुसरी घटना म्हणजे ब्रिटिशांनी मार्च १८१८ मध्ये सिंहगडावर हजारो तोफगोळ्यांचा मारा करून सिंहगड ताब्यात घेतला होता. या दोन घटनांपैकी कुठल्यातरी एका आक्रमणाची साक्ष देणारा हा तोफगोळा असू शकतो.  - डॉ. नंदकिशोर मते, सिंहगड अभ्यासक

 

English
हिंदी सारांश
Web Title : Cannonball Discovery at Sinhagad Fort Reveals Battle History

Web Summary : Restoration unearths a cannonball near Kalyan Darwaja, a testament to Sinhagad's battle-filled past. This discovery highlights the fort's strategic importance and offers insights into Maratha warfare, enriching our understanding of its historical significance. Further analysis will reveal more details.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र