मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 22:00 IST2026-01-03T21:58:52+5:302026-01-03T22:00:02+5:30
राज्यातील शेतकऱ्यांकरिता शेतामध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी आदी कामांसाठी तसेच शेतीमाल बाजारात पोहोचविण्यासाठी बारमाही शेतरस्ते उपलब्ध करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश
पुणे : ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून कामे करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या. राज्यातील शेतकऱ्यांकरिता शेतामध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी आदी कामांसाठी तसेच शेतीमाल बाजारात पोहोचविण्यासाठी बारमाही शेतरस्ते उपलब्ध करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या पूर्वनियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी समिती सदस्य व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. ही योजना राबविण्यासाठी सोपी व सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील शेतकऱ्यांकरिता शेतामध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी आदी कामांसाठी तसेच शेतीमाल बाजारात पोहोचविण्यासाठी बारमाही शेतरस्ते उपलब्ध करणे आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर महसूलमंत्री, जिल्हास्तरावर पालकमंत्री आणि विधानसभास्तरावर आमदारांच्या अध्यक्षतेखाली समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. ही योजना महसूल विभागामार्फत राबविण्यात येणार असून संबधित ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद (बांधकाम विभाग), पंतप्रधान, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभाग आणि वन विभाग यांसारख्या विविध यंत्रणा कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम करणार आहेत, अशी माहिती रोहयो शाखेच्या उपजिल्हाधिकारी डॉ. चारुशीला देशमुख-मोहिते यांनी दिली.