पिंपरीत बँकेत बनावट नोटा जमा करण्याचा प्रयत्न;संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 16:44 IST2025-08-13T16:44:17+5:302025-08-13T16:44:30+5:30

- बँकेतील रोखपाल (कॅशिअर) प्रवीण विवेक क्षीरसागर यांनी यंत्रामध्ये या नोटा तपासल्या असता २०० रुपयांच्या नऊ नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आले.

pune news Attempt to deposit fake notes in a bank in Pimpri; Case registered at Sant Tukaramnagar police station | पिंपरीत बँकेत बनावट नोटा जमा करण्याचा प्रयत्न;संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरीत बँकेत बनावट नोटा जमा करण्याचा प्रयत्न;संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : आयसीआयसीआय बँकेत बनावट नोटा जमा करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २० मार्च रोजी पिंपरी येथे घडली. पिंपरी येथील ऑटोक्लस्टर एम्पायर स्क्वेअरमधील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेच्या उपव्यवस्थापकाने या प्रकरणी मंगळवारी (दि. १२ ऑगस्ट) संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आनंद सुरेश गांधी यांचे होलसेल औषधांचे दुकान आहे. भास्कर सखाराम खोपकर हे गांधी यांच्या दुकानात कामाला आहेत. गांधी यांनी बँकेत जमा करण्यासाठी खोपकर यांच्याकडे ८० हजार १०० रुपये रोख रक्कम दिली.

बँकेतील रोखपाल (कॅशिअर) प्रवीण विवेक क्षीरसागर यांनी यंत्रामध्ये या नोटा तपासल्या असता २०० रुपयांच्या नऊ नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आले. याबाबत गांधी यांच्याकडे विचारणा केली. त्यांचे अंदाजे ९० ते १०० रिटेलर दुकानदार असल्याने या बनावट नोटा कोणी दिल्या याबाबत त्यांना माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title: pune news Attempt to deposit fake notes in a bank in Pimpri; Case registered at Sant Tukaramnagar police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.