निष्काळजीपणे कारचा दरवाजा उघडल्याने अपघात;महिला पोलिस कर्मचाऱ्यास दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 18:45 IST2025-08-21T18:45:25+5:302025-08-21T18:45:39+5:30
स्टेट बँक ऑफ इंडिया, ट्रेझरी बँक येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारमधील व्यक्तीने निष्काळजीपणे अचानक चारचाकीचा दरवाजा उघडला.

निष्काळजीपणे कारचा दरवाजा उघडल्याने अपघात;महिला पोलिस कर्मचाऱ्यास दुखापत
पुणे : चारचाकी वाहनचालकाने निष्काळजीपणे गाडीचा दरवाजा अचानक उघडल्याने झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या महिला पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची घटना बंडगार्डन परिसरात घडली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा संतोष करडे (वय ३८, पोलिस अंमलदार, लष्कर पोलिस स्टेशन, पुणे) या १४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता सोमवर पेठेतील पोलिस वसाहत येथून दुचाकीवरून जात होत्या.
त्यावेळी स्टेट बँक ऑफ इंडिया, ट्रेझरी बँक येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारमधील व्यक्तीने निष्काळजीपणे अचानक चारचाकीचा दरवाजा उघडला. त्यामुळे करडे यांची दुचाकी दरवाजावर आदळून अपघात झाला. यामध्ये करडे जखमी झाल्या. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.