शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

जिथे जवळचे नातेवाईकही 'आपलेपण' विसरले; तिथे पुणे महापालिकेने ३९७ कोरोना बाधितांचे मृतदेह उचलले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 9:11 PM

कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक मृतदेह घेण्यास येत नाहीत; तिथे महापालिकेचे कर्मचारी जीवावर उदार होत हे मृतदेह उचलत आहेत

ठळक मुद्देकोरोनाच्या भीतीने मृतदेह उचलण्यास नकार देणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांची चौकशी होणार

पुणे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून पुण्यामध्ये ३०० पेक्षा अधिक कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. या मृतदेहांना जिथे जवळचे नातेवाईक हात लावायला तयार होत नाहीत, तिथे महापालिकेचे कर्मचारी जीवावर उदार होत हे मृतदेह उचलत आहेत. आजवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल २९७ बाधितांचे मृतदेह उचलले आहेत. शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असून त्यांचा मृत्युदर ५ टक्के आहे. हा मृत्युदर वाढू नये याकरिता पालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक मृतदेह घेण्यास येत नाहीत किंवा अंत्यविधी करण्यासाठी पालिकेवरच जबाबदारी टाकतात. अशावेळी हे मृतदेह उचलण्याची आणि त्यांच्यावर अंत्यविधी करण्याची जबाबदारी पालिका कर्मचाऱ्यांवर येते. आजवर पालिका कर्मचाऱ्यांनी २९७ कोरोनाबधितांचे मृतदेह स्मशानभूमीत पोहचविणे, अंत्यविधी करणे अशी कामे केली आहेत. यासोबतच ३ बेवारस मृतदेह आणि एका निगेटिव्ह रुग्णाचाही मृतदेह पालिका कर्मचाऱ्यांनी उचलत पुढील सोपस्कार पार पाडल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले. 

'त्या' कर्मचाऱ्यांची होणार चौकशी..पाषाण येथील शांती निकेतन सोसायटीमध्ये मृत्यू झालेल्या अभियंत्याचा मृतदेह कोरोनाच्या भीतीने उचलण्यास नकार देणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (ज.) रुबल अगरवाल यांनी ही माहिती दिली. ही घटना शुक्रवारी घडली होती. शांतिनिकेतन सोसायटीमधील मूळच्या तमिळनाडू येथील एका अभियंत्याचा शुक्रवारी घरातच मृत्यू झाला होता. या अभियंत्याला मूत्रपिंड आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यांच्यावर ऑनलाईन उपचार सुरू होते. उपचार घेत असतानाच त्यांच्या छातीमध्ये पाणी झाले होते. कोरोनासदृश लक्षणे असल्याने डॉक्टरांनी त्यांना कोरोना तपासणी करण्याचा सल्ला दिला होता. ही तपासणी करण्यापूर्वीच त्यांचा घरामध्ये मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह उचलण्यास सोसायटीतील रहिवासी धजावत नव्हते. घटनास्थळी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचा?्यांनी पीपीई किट असूनही हा मृतदेह उचलण्यास नकार दिला होता. त्यामुळे पोलिसांनीच पीपीई किटा घालून हा मृतदेह नवव्या मजल्यावरून खाली आणत रुग्णवाहिकेमधून ससूनला पोचविला होता. या अभियंत्यांची मृत्यूपश्चात केलेली कोरोना तपासणी निवेटिव्ह आली होती. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त (ज.) रुबल अगरवाल यांनी या प्रकरणाची आणि मृतदेह उचलण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करणार असल्याची माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी नकार देण्यामागे काही विशिष्ट कारण होते की घाबरून त्यांनी नकार दिला याचीही माहिती घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाDeathमृत्यूCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFamilyपरिवार