शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

‘रंग यात्रा’ ॲपचा अट्टहास का ? पुणे महापालिकेच्या ऑनलाइन बुकिंगला कलाकारांचा विरोध

By श्रीकिशन काळे | Updated: March 15, 2025 16:19 IST

-कोणाशीही चर्चा न करताच पालिकेने ॲप तयार केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. हे ॲप बंद करावे, अशी मागणीही होत आहे.

पुणे : पुणे महापालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक केंद्र विभागाच्या वतीने नाट्यगृह आणि सांस्कृतिक केंद्रामधील ऑनलाइन बुकिंगसाठी ‘रंग यात्रा’ हे मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात आले. या ऑनलाइन बुकिंग अँपला पुणे शहरातील विविध संस्थांनी विरोध केला आहे. कोणाशीही चर्चा न करताच पालिकेने ॲप तयार केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. हे ॲप बंद करावे, अशी मागणीही होत आहे.

शहरातील नाट्यसंस्था व इतर कलाकारांनी एकत्र येऊन बैठक घेतली. त्यामध्ये या ॲपचा विरोध केला आणि तो निर्णय रद्द करण्याचा ठराव करण्यात आला. जर ॲप सुरू ठेवले तर कलाकारांनी आंदोलनाचा इशारा दिला. या बुकिंगच्या विरोधाला पाठिंबा म्हणून मुंबईतून प्रशांत दामले, शरद पोंशे, भाग्यश्री देसाई, अशोक हांडे यांनी देखील पाठिंबा दर्शविला असल्याचे राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. या वेळी संवाद, मराठी चित्रपट असोसिएशन, मोरया थेटर्स, शिवरत्न प्रॉडक्शन, वेदवंदी, विजय पटवर्धन फांउडेशन, निनाद फिल्म, मनोरंजन, रंग यात्रा, सुरश्री प्रॉडक्शन आदी अनेक संस्थांनी विरोध दर्शविला. 

या ॲपमुळे नाटक व्यवस्थापक, निर्माते, कलाकार, लावणी निर्माते, व्यवस्थापक, या सर्वांच्या दृष्टीकोनातून ऑनलाइन बुकिंग अव्यवहार्य ठरणार आहे. ऑनलाइन बुकिंग करत असताना हजारोंच्या घरात जर नाट्यगृहासाठी अर्ज आले, तर कुठल्याही नाट्यगृहाच्या बॅक ऑफिसला हुशार, अनुभवी, सक्षम टीम नाही. त्यामुळे गोंधळ वाढेल. सध्या नाट्यगृहांमध्ये इंटरनेट किंवा वायफायची सुविधा देखील अद्याप नाही, मग एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन बुकिंग केलेल्या संस्थांचे वाटप कसे करणार ? ऑनलाइन बुकिंग करताना मोठमोठ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या पैशाच्या जोरावर सर्व बुकिंग अगोदरच करून ठेवतील. त्यामुळे इतर नाट्यसंस्था किंवा कलाकारांना बुकिंग करणं अवघड जाईल.पुणे महानगरपालिकेने हे ऑनलाईन बुकिंग ॲप ज्यांच्यासाठी तयार केले, त्याच सर्व मराठी नाटक, व्यवस्थापक, निर्मात्यांनी, लावणी निर्मात्यांनी विरोध दर्शविला आहे. तरी देखील या ॲपचा अट्टहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे. या संदर्भात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात येणार आहे. याविषयी पुणे महापालिका आयुक्तांना व सांस्कृतिक उपायुक्तांना निवेदन दिले असून, ॲप रद्द करण्याची मागणी केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड