पुणे : कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी गेल्या दोन दिवसांत राबवलेल्या धडक मोहिमेत महापालिकेने सुमारे २५ हजार चौरस मीटर क्षेत्राचे भूसंपादन केले आहे. एनएचएआयमार्फत सुरू असलेल्या कात्रज उड्डाणपुलाच्या उतरणाऱ्या मार्गाचा अडथळा दूर झाला असून, तिथे प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
महापौर मंजूषा नागपुरे आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला. आमदार योगेश टिळेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, प्रभाग समिती अध्यक्ष रंजना टिळेकर, नगरसेविका अर्चना जगताप, पूजा कदम, अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पथ विभागाचे अधीक्षक अभियंता अजित बांबळे, भूसंपादन अधिकारी श्वेता दारुणकर आदी उपस्थित होते.
कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी ५० मीटर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी पालिकेने सुमारे १९७ कोटी रुपये राज्य सरकारकडे जमा केले होते. २७ एप्रिल २०२६ रोजी विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी ४१ हजार चौरस मीटर क्षेत्राचा निवाडा जाहीर केला होता. त्यानंतर १५ दिवसांची नोटीस देऊन १४ मे पासून प्रत्यक्ष ताबा घेण्यास सुरुवात करण्यात आली.
दोन दिवसांत ४८ मिळकतींचा ताबा
पुणे महापालिकेने १४ आणि १५ मे या दोन दिवसांत एकूण १०९ पैकी ४८ मिळकती प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. या मोहिमेमुळे २५ हजार चौरस मीटर क्षेत्र आता महापालिकेच्या ताब्यात आले आहे. उड्डाणपुलाच्या कामासाठी आवश्यक असलेली जागा ताब्यात मिळताच पथ विभागाने तातडीने कामाला सुरुवात केली आहे. यामुळे अनेक दिवसांपासून रखडलेला उड्डाणपुलाचा मार्ग आता पूर्णत्वास जाणार आहे.
Web Summary : Pune Municipal Corporation acquired 25,000 sq. meters for Katraj-Kondhwa road widening. Obstacles to the Katraj flyover construction are cleared, and work has commenced. 48 properties were acquired, expediting flyover completion after land possession.
Web Summary : पुणे महानगरपालिका ने कात्रज-कोंढवा रोड को चौड़ा करने के लिए 25,000 वर्ग मीटर भूमि का अधिग्रहण किया। कात्रज फ्लाईओवर निर्माण की बाधाएं दूर हो गईं, और काम शुरू हो गया है। भूमि कब्जे के बाद 48 संपत्तियां अधिग्रहित की गईं, जिससे फ्लाईओवर का काम तेजी से पूरा होगा।