PUNE MIDC FIRE : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दु:ख; मृतांच्या वारसांना २ लाखांची मदत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 21:34 IST2021-06-07T21:32:05+5:302021-06-07T21:34:21+5:30

Pune Fire : सॅनिटाझर तयार करणाऱ्या कंपनीला लागली होती आग. अनेकांचा आगीत होरपळून झाला होता मृत्यू.

PUNE MIDC FIRE Prime Minister Narendra Modi expresses grief 2 lakh aid announced to family members | PUNE MIDC FIRE : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दु:ख; मृतांच्या वारसांना २ लाखांची मदत जाहीर

PUNE MIDC FIRE : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दु:ख; मृतांच्या वारसांना २ लाखांची मदत जाहीर

ठळक मुद्देसॅनिटाझर तयार करणाऱ्या कंपनीला लागली होती आग.अनेकांचा आगीत होरपळून झाला होता मृत्यू.

पौड रस्त्यावरील घोटवडे फाट्याजवळील उरवडे रोड येथे एका सॅनिटायझर बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग लागून काही कर्मचाऱ्यांना यात होरपळून मृत्यू झाला. यामध्ये प्रामुख्याने महिला कामगारांचा समावेश आहे. सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना मदत करण्याची घोषणा केली आहे.

पंतप्रधान कार्यालयानं ट्विटरद्वारे यासंदर्भातील माहिती दिली. "महाराष्ट्रात पुण्यातील एका कारखान्यात लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकास 'पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून' २ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. जखमी व्यक्तींना ५० हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे," असं पंतप्रधान कार्यालयानं सांगितलं आहे.



राज्याकडूनही मदत

“पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल,” अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

Web Title: PUNE MIDC FIRE Prime Minister Narendra Modi expresses grief 2 lakh aid announced to family members