पुणे :पुणे महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक येत्या ९ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता होणार आहे. या निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची एकहात्ती सत्ता आली आहे. त्यानंतर महापौरपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात महापौरपद महिला खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.
आता महापौरपदाची निवड करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. विभागीय आयुक्त यांनी या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची नियुक्ती केली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारीला सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. महापौरपदाची निवडणूक होणार त्या दिवशी सभा सुरू झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांची मुदत दिली जाते. त्यानंतर महापौरपदासाठी मतदान घेतले जाते.
आरक्षण सोडतीवरील याचिकेवर शुक्रवारी सुनावणी
पुणे महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झाले आहे. ही आरक्षण सोडत ही चक्रानुक्रमे होणे गरजेचे होते. पण ते झाले नाही. त्यामुळे ही आरक्षण सोडत रद्द करणारी याचिका उच्च न्यायालयात न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या शुक्रवारी (दि. ३०) सुनावणी होणार आहे.
Web Summary : Pune's mayoral election is scheduled for February 9th. Nomination filing is on February 3rd. The post is reserved for women. A petition challenging the reservation is pending in High Court, with a hearing scheduled soon.
Web Summary : पुणे में महापौर का चुनाव 9 फरवरी को होगा। नामांकन 3 फरवरी को दाखिल किए जाएंगे। यह पद महिलाओं के लिए आरक्षित है। आरक्षण को चुनौती देने वाली याचिका उच्च न्यायालय में लंबित है, जिस पर जल्द ही सुनवाई होनी है।