Pune Mayor: पुणे महापालिका विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे गटनेते ॲड. नीलेश निकम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 10:21 IST2026-02-11T10:21:01+5:302026-02-11T10:21:09+5:30

Pune Mayor ॲड. नीलेश निकम हे गोखलेनगर भागातून पाचव्यांदा महापालिकेत निवडून आले असून त्यांनी महापालिकेत सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष अशा महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे

Pune Mayor NCP group leader Adv. Nilesh Nikam appointed as Leader of Opposition in Pune Municipal Corporation | Pune Mayor: पुणे महापालिका विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे गटनेते ॲड. नीलेश निकम

Pune Mayor: पुणे महापालिका विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे गटनेते ॲड. नीलेश निकम

पुणे : महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे गटनेते ॲड. नीलेश निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापौर मंजूषा नागपुरे यांनी याबाबतचे पत्र ॲड. निकम यांना दिले.

महापालिका निवडणुकीत भाजपचे ११९ नगरसेवक निवडून आल्याने महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली आहे. तर २७ नगरसेवक निवडून आलेला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादीने पुणे महापालिकेच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक ॲड. नीलेश निकम यांची निवड केली होती. त्यामुळे ॲड. नीलेश निकम हेच विरोधी पक्षनेते होणार, हे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेमध्ये सोमवारी महापौरपदी भाजपच्या मंजूषा नागपुरे आणि उपमहापौरपदी रिपाइं आठवले गटाचे परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर महापौर मंजूषा नागपुरे यांनी सर्वांत मोठ्या दोन नंबरच्या पक्षाचे गटनेते असलेले ॲड. नीलेश निकम यांना विरोधी पक्षनेतेपदाचे पत्र दिले.

ॲड. नीलेश निकम हे गोखलेनगर भागातून पाचव्यांदा महापालिकेत निवडून आले आहेत. यापूर्वी त्यांनी महापालिकेत सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष अशा महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. २०१२ आणि २०१७ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. परंतु, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ते विजयी झाले आहेत.

Web Title : पुणे महानगरपालिका में NCP के नीलेश निकम विपक्ष नेता नियुक्त

Web Summary : NCP के नीलेश निकम पुणे महानगरपालिका के विपक्ष नेता बने। महापौर मंजूषा नागपुरे ने उन्हें नियुक्ति पत्र सौंपा। पांच बार के पार्षद निकम पहले भी महत्वपूर्ण पदों पर रहे हैं। बीजेपी की जीत के बाद NCP दूसरी सबसे बड़ी पार्टी है।

Web Title : NCP's Nilesh Nikam Appointed Opposition Leader in Pune Municipal Corporation

Web Summary : NCP's Nilesh Nikam is Pune Municipal Corporation's opposition leader. Mayor Manjusha Nagpure handed him the appointment letter. Nikam, a five-time corporator, previously held key positions. The NCP is the second largest party after BJP's victory.