Pune :पुणे सोलापूर हायवेवर कारचा भीषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 20:17 IST2024-07-02T20:16:12+5:302024-07-02T20:17:53+5:30
गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात घडला असून गाडीच्या समोरील बाजूचा पूर्णतः चुराडा झाला

Pune :पुणे सोलापूर हायवेवर कारचा भीषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू
किरण शिंदे
पुणे : पुणेसोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune Solapur Expressway) इंदापूर जवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. आज सायंकाळच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील डाळज २ येथे अपघात झाला. गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात गाडीच्या समोरील बाजूचा पूर्णतः चुराडा झाला आहे.
फिरोज कुरेशी, रफिक कुरेशी, इरफान पटेल, मेहबूब कुरेशी आणि फिरोज कुरेशी अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर अमीर सय्यद हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर भिगवण येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातातील जखमी आणि मयत तेलंगणा राज्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.
याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, पुण्याहून सोलापूरच्या दिशेने कार निघाली होती. इंदापूर तालुक्याच्या हद्दीतील डाळज या ठिकाणाहून ही कार भरगाव वेगात जात असतानाच डाव्या बाजूचा टायर फुटला. त्यानंतर गाडी उलटली आणि साधारण पन्नास मीटर ही गाडी जमिनीला घासत पुढे गेली. चार ते पाच वेळेत पलटी झाल्यानंतर ही गाडी सिमेंटच्या खांबाला जाऊन धडकली. आणि त्यानंतर नाल्यात पडली. गाडीतील सहापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जखमी झाला आहे.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलीस आणि घटनास्थळी गाव घेतली. अपघातग्रस्तांना बाजूला काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र येथील पाच जणांचा मृत्यू झाला होता. सर्व अपघातग्रस्त हे तेलंगणा राज्यातील नारायण खेड येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.