शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
3
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
4
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
5
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
6
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
7
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
8
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
9
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
10
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
11
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
12
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
13
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
14
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
15
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
16
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
17
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
18
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
19
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
20
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
Daily Top 2Weekly Top 5

पुणे लोकसभा निवडणूक : आधी लगीन लोकशाहीचे : पुण्यातील श्रद्धा भगतचे लग्नापूर्वी मतदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 10:40 IST

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण. आयुष्यातल्या या महत्त्वाच्या दिवशी पुण्यतिक श्रद्धा भगत या तरुणीने लग्न विधींच्या आधी मतदान करत राष्ट्रीय कर्तव्य बजावले आहे..

पुणे : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण. आयुष्यातल्या या महत्त्वाच्या दिवशी पुण्यतिक श्रद्धा भगत या तरुणीने लग्नाच्या विधींच्या आधी मतदान करत राष्ट्रीय कर्तव्य बजावले आहे.श्रद्धा भुगाव येथे अमित सातपुते यांच्याशी मंगळवारी( दि. २३)  विवाह बंधनात अडकणार आहेत.मात्र, लग्नाआधी तिने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान केले आणि मगच त्या विवाहस्थळी रवाना झाल्या.. लोकसभा निवडणुकीच्या तिसºया टप्प्यांत महाराष्ट्रातील चौदा जागांसाठी मंगळवारी मतदान होत आहे. पुण्यात सकाळपासूनच नागरिकांकडून मतदानाचा हक्क बजावणयासाठी शहरातील विविध मतदान केंद्रावर गर्दी केली जात आहे. मंगळवारी श्रध्दा या विवाह बंधनात अडकणार आहे. मात्र, त्याआधी त्यांनी मतदान केंद्रावर नऊवारी साडी, हिरवा चुडा, मुंडावळ्या अशा वेषात येत सर्वांचे लक्ष वेधून नूमवी प्रशालेत मतदान केले. बी.एस्सी. इतके शिक्षण घेतलेल्या श्रद्धा हिने यावेळी लोकमतशी बोलताना सांगितले की, मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.ते प्रत्येकाने बजावायला हवे. आज माज्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस असला तरी देशाच्या दृष्टीनेही हा भविष्य ठरवणारा दिवस आहे. त्यामुळे मी लग्नापूर्वी माझा हक्क बजावण्याचा निर्णय घेतला.माझे आई वडील आणि कुटुंबाने मला यात साथ देत त्यानुसार नियोजन केले.मी सर्वांना हेच आवाहन करेन की, काहीही झालं तरी मतदान करायला विसरू नका.आपला हक्क आवर्जून बजावा.

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारणVotingमतदान