शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

Pune Lockdown : १७ दिवसांत १ लाखांहून अधिक पुणेकरांचा ई-पाससाठी अर्ज; ५७ हजार ९९ अर्ज पोलिसांनी केले रिजेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 10:21 PM

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य शासनाने २३ एप्रिलपासून राज्यात जिल्हाअंतर्गत प्रवासाला बंदी घातली.

पुणे : राज्यात आंतरजिल्हा प्रवासावर बंधने आणण्यानंतर गेल्या १७ दिवसांमध्ये १ लाख ५ हजार ७४४ पुणेकरांनी ई पास मिळविण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयात अर्ज केले. त्यापैकी २७ हजार ५९२ जणांचे ई पास मंजूर करण्यात आले आहे. तब्बल ५७ हजार ९९ जणांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य शासनाने २३ एप्रिलपासून राज्यात जिल्हाअंतर्गत प्रवासाला बंदी घातली. अत्यावश्यक कारणासाठी प्रवास करायचा असेल तर ई -पास बंधनकारक करण्यात आले आहे. यावेळी ई पाससाठी कोविड चाचणी केलेल्या प्रमाणपत्र जोडण्यास अत्यावश्यक केले आहे. तसेच केवळ जवळच्या नातेवाईकांचे निधन अथवा वैद्यकीय सुविधा अशा कारणांसाठी ई पास दिला जात आहे. त्यामुळे अन्य कारणासाठी कोणी अर्ज केला असेल. तसेच कोविड प्रमाणपत्र जोडले नसेल, तर ई पास मंजूर केला जात नाही. त्यामुळे ई पास नाकारले जात असल्याचे गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी सांगितले.

असा करा ई- पाससाठी अर्जपोलिसांनी एक वेबसाईटचा पत्ता दिला आहे. त्यावरील अर्ज भरावा़ त्यात प्रामुख्याने प्रवासाचे कारण काय, कधी, कोठे, कोणत्या गाडीने जाणार याची आवश्यक ती माहिती भरावी. तसेच त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे उदा. कोविड चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट, आधारकार्ड व ज्या कारणासाठी प्रवास करायचा आहे. त्याची पुष्टी देणारी कागदपत्रे जोडावीत. 

जिल्ह्याबाहेर जायचे असेल तर त्यासाठी तुमच्याकडे ई पास आवश्यक आहे. जिल्ह्याच्या शहराच्या सीमेवर तुम्हाला अडविल्यास व तेथे तुमच्याकडे ई पास नसल्यास तेथून तुम्हाला परत माघारी पाठविले जाऊ शकते. 

२४ तासांत मिळतो तुम्हाला ई- पासप्रवासासाठी नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज आल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सेवा प्रकल्पात २४ तास कर्मचार्‍याची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्ज आल्यावर तेथील कर्मचारी अर्जाचे कारण पाहतात. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जोडलेली आहेत का. ज्यांनी अर्ज केला, त्यांचेच आधारकार्ड आहे का. कोविड चाचणीचे निगेटिव्ह रिपोर्ट सोबत जोडला आहे का, याची तपासणी करतात. कारण योग्य वाटल्यास अर्ज मंजूर केला जातो. हे काम काही मिनिटांमध्ये पूर्ण होते. मात्र अनेकदा अर्जांची संख्या खूप असते. त्यामुळे प्रलंबित अर्जांची संख्या अधिक असेल तर साधारण २४ तासात अर्जावर निर्णय होतो.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसTravel Tipsट्रॅव्हल टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्या