- आकाश झगडेपिंपरी : शहरात रस्त्यांवर सध्या ग्रँड टूर सायकल स्पर्धेचा थरार पाहायला मिळत आहे. लाखाेंच्या सायकली, अंगात फिट कपडे, डोळ्यांवर महागडा गॉगल आणि डोक्यावर हेल्मेट घालून सायकलपटू वेगाने पॅडल मारत होते. सगळं कसं प्रोफेशनल सुरू होतं; पण या सगळ्या शिस्तीला छेद देत एका अशा खेळाडूची एंट्री झाली की, प्रत्यक्ष आयोजकही चक्रावून गेले.
कुठून तरी पांढरं शुभ्र धोतर, डोक्यावर टोपी आणि पायात साधी कोल्हापुरी चप्पल घातलेले आजोबा आपल्या लोखंडी सायकलीवरून थेट ट्रॅकवर आले. त्यांच्या सायकलला ना गिअर होते, ना कोणते गॅझेट्स लावले होते; पण त्यांचा आत्मविश्वास एखाद्या सराईत सायकलपटूपेक्षा कमी नव्हता. हे दृश्य पाहून रस्त्याच्या कडेला उभे असलेले प्रेक्षक पोट धरून हसायला लागले.
सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
अनेक जणांनी या आजोबांचा व्हिडीओ शूट केला आणि बॅक ग्राऊंडला 'आप्पाचा विषय लय हार्डय' हे गाण लावून सोशल मीडियावर टाकला. बघता-बघता आजोबा जगभरात पोहोचले. नेटकऱ्यांनी यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. लाखाची सायकल एकीकडे आणि आजोबांचा स्वॅग एकीकडे, आजोबांनी दाखवून दिलं की, सायकल महत्त्वाची नसते, तर चालवणारा गडी महत्त्वाचा असतो, हेच ते पुण्याचे ‘अल्टिमेट’ सायकलपटू, ज्यांना कोणत्याही नियमांचे बंधन नसतं, प्रोफेशनल सायकलपटू विचार करत असतील की, आपण इतकी तयारी केली आणि आजोबा मध्येच ओव्हरटेक करून गेले, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
आजोबांची ‘ग्रँड टूर’ ठरली चर्चेचा विषय
आजोबांना कदाचित माहीतही नसेल की, ही कोणती मोठी स्पर्धा आहे. ते कदाचित आपल्या कामासाठी नेहमीच्या मार्गावरून चालले असावेत; पण त्यांच्या या ‘धडाकेबाज’ एंट्रीने मात्र महागड्या परदेशी सायकलींची चमक फिकी पाडली. सध्या व्हिडीओ ‘ट्रेंडिंग’मध्ये असून, पुण्याच्या या सायकल स्पर्धेची आठवण म्हणून आता सायकलपटूंपेक्षा या स्वॅगर आजोबांचीच जास्त चर्चा होत आहे.
Web Summary : An elderly man in traditional attire unexpectedly joined Pune's Grand Tour cycling race on his old bicycle, overshadowing the professionals. His entry, captured on video, went viral, celebrated for its unpretentious charm and challenging the notion that expensive gear is essential.
Web Summary : पुणे ग्रैंड टूर साइकिल दौड़ में एक पारंपरिक पोशाक पहने बुजुर्ग व्यक्ति अप्रत्याशित रूप से अपनी पुरानी साइकिल पर शामिल हो गए, जिससे पेशेवरों पर छाया पड़ गई। उनका प्रवेश, वीडियो में कैद, वायरल हो गया, जो अपनी सरल आकर्षण के लिए मनाया गया और इस धारणा को चुनौती दी कि महंगा गियर आवश्यक है।