शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune: अक्षरशः मुलींना चक्कर आली; दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा, कॉलेज प्रशासनाचा भोंगळ कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 10:16 IST

जानेवारी महिन्यातच आम्ही दूषित पाण्याबाबत तक्रार केली होती, पण त्यावेळी फक्त टाकी स्वच्छ केल्याचे भासवले गेले. आता विषबाधा झाल्यावर त्यांनी घाईघाईने फिल्टर बदलले आहेत - विद्यार्थिनींची प्रतिक्रिया

लोहगाव : येथील मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्यूट ॲाफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृहात राहणाऱ्या १२ विद्यार्थिनींना दूषित पाण्यामुळे विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या सर्व विद्यार्थिनींवर सध्या साईश्रद्धा हॉस्पिटल, लोहगाव येथे उपचार सुरू असून, कॉलेज प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा संताप विद्यार्थिनींनी व्यक्त केला आहे.

बाधीत विद्यार्थिनींशी संवाद साधला असता, त्यांनी कॉलेज प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला. विद्यार्थिनींनी सांगितले की, ‘आम्ही वापरत असलेल्या पाण्याच्या फिल्टरमधून पिवळसर आणि घाण पाणी येत होते. १० फेब्रुवारी रोजी आम्ही पाण्याच्या टाकीत आणि बादलीत काळ्या रंगाच्या अळ्या पाहिल्या होत्या. त्याचे फोटो आणि व्हिडिओ आम्ही कॉलेज प्रशासनाला दाखवले, त्याबाबत तक्रारही केली तरी कोणतीही कारवाई केली नाही. ‘जानेवारी महिन्यातच आम्ही दूषित पाण्याबाबत तक्रार केली होती; पण त्यावेळी फक्त टाकी स्वच्छ केल्याचे भासवले गेले. फिल्टर बदललाच नव्हता. आता विषबाधा झाल्यावर त्यांनी घाईघाईने फिल्टर बदलले आहेत. जेव्हा आम्ही फिल्टर उघडून दाखवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्हाला ‘तुम्ही कोण विचारणार? तुम्हाला तो अधिकार नाही’, असे म्हणून गप्प करण्यात आले.

या संदर्भात कॉलेजच्या प्राचार्य रूपेश भोरटाके यांच्याशी संपर्क साधला असता, मी बाहेरगावी जात असताना ही घटना कळाली व ‘आम्ही तपास करत आहोत’ असे त्रोटक उत्तर दिले. अधिक विचारणा केली असता दोषींवर कारवाई करू असे आश्वासन दिले.

रुग्णालयात दाखल विद्यार्थिनींची नावे

श्रेणी महाडिक (चिपळूण), रुपाली महाजन (जळगाव), श्रीनिधी गुप्ता (नागपूर), साक्षी स्वामी (अहिल्यानगर), सिद्धी उमाटे (लातूर), श्रेयश इरकर (धाराशिव), मानसी देशमुख (परभणी), कुनिका देवळकर (चंद्रपूर), कमलेश निकम (चाळीसगाव), तृप्ती गावंडे (संभाजीनगर), प्रणया चव्हाण (कारंजा), समृद्धी हांडे (जुन्नर)

विद्यार्थिनींच्या जीविताशी खेळ; अक्षरशः चक्कर येऊन पडल्या मुली 

विषबाधेची तीव्रता इतकी होती की, विद्यार्थिनी वसतिगृहातच चक्कर येऊन पडू लागल्या. चालता बोलता विद्यार्थिनी खाली पडत असल्याने एकच खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वी विद्यार्थिनींनी स्वत: दवाखान्यात जाऊन तपासणी केली, सलाइनही घेतले; परंतु वसतिगृहात परत गेल्यावर पुन्हा त्रास सुरू झाला. धक्कादायक बाब म्हणजे हा कॉलेज परिसर सुनसान आहे. तेथे वाहतुकीची वर्दळ नसते. मुलींना त्रास होत असतानाही कॉलेज प्रशासनाने वेळेवर रुग्णवाहिका किंवा स्वतःची गाडी उपलब्ध करून दिली नाही. मुलींना खासगी वाहनाने किंवा एकमेकींच्या मदतीने रुग्णालयात जावे लागले.

रक्त चाचणी अहवाल दडपण्याचा प्रयत्न आणि धमकी

रुग्णालयात उपचार घेत असताना विद्यार्थिनींनी त्यांच्या रक्ताच्या चाचणीचे (ब्लड रिपोर्ट) अहवाल मागितले. मात्र, त्यांना रिपोर्ट देण्यास टाळाटाळ केली जात होती. विद्यार्थिनींचा आरोप आहे की, ‘कॉलेज कर्मचारी आम्हाला सांगत आहे की अहवाल त्यांच्याकडे आहेत आणि ते योग्य वेळी दाखवले जातील. आम्हाला आमची वैद्यकीय स्थिती जाणून घेण्याचा हक्क आहे; पण तो नाकारला जात होता. इतकेच नाही तर, मीडिया किंवा पोलिसांकडे तक्रार करू नये यासाठी विद्यार्थिनींवर दबाव टाकला जात होता. आमच्या स्टुडंट कौन्सिलच्या प्रमुखाला बोलावून सांगण्यात आले की, पोलिसांना किंवा मीडियाला काहीही सांगू नका. जर तक्रार केली तर कारवाई करण्याची धमकीही दिली जात होती,’ असे विदारक सत्य विद्यार्थिनींनी लोकमतला उलगडून सांगितले.

सदर विद्यार्थ्यांनी काल रात्री उलट्या चक्कर येत असल्याने ॲडमीट झाल्या कालच त्यांचे सोनोग्राफी, रक्तचाचणी नमुने घेऊन आज सकाळी ११.३० लाच रिपोर्ट आलेत. ज्यांना पाहायचे त्यांनी थेट नर्स किंवा डॅाक्टरांना विचारून पहावे, इतर कुणाला विचारून काय फायदा ? सध्या सगळ्या विद्यार्थीनी नॅार्मल आहे, जनरल वॅार्डमध्ये आहेत.  - डॅा. विकास गायकवाड, साईश्रद्धा हॅास्पिटल

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Water Contamination Sickens Students, College Negligence Alleged

Web Summary : Dozens of Pune college students fell ill due to contaminated water in their hostel. Students allege negligence, reporting prior complaints about dirty water and inaction from the college administration. Students were threatened to not report to the police or media.
टॅग्स :PuneपुणेLohgaonलोहगावStudentविद्यार्थीWomenमहिलाEducationशिक्षणHealthआरोग्यcollegeमहाविद्यालयPoliceपोलिस