अशी हाक का मारली..? चेष्टा मस्करीच्या वादातून तरुणाचा खून; तीन आरोपींना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 18:50 IST2026-03-11T18:50:02+5:302026-03-11T18:50:56+5:30

थट्टा मस्करीच्या वादातून टोळक्याने तरुणावर चाकूने वार करुन खून केला. ही घटना कॅम्पातील न्यू मोदीखाना येथे घडली. 

pune crime youth murdered over prank dispute; Three accused arrested | अशी हाक का मारली..? चेष्टा मस्करीच्या वादातून तरुणाचा खून; तीन आरोपींना अटक 

अशी हाक का मारली..? चेष्टा मस्करीच्या वादातून तरुणाचा खून; तीन आरोपींना अटक 

पुणे : थट्टा मस्करीच्या वादातून टोळक्याने तरुणावर चाकूने वार करुन खून केला. ही घटना कॅम्पातील न्यू मोदीखाना येथे घडली.  फैसल फारुख खान (वय ३०, रा. कौसरबाग, कोंढवा) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. लष्कर पोलिसांनी अली अब्बास अश्रफअली सय्यद (वय २५, रा. चुडामण तालीम, भवानी पेठ), सोहेल युसूफ तांबोळी (वय २२, रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर), अश्रफअली गफार सय्यद (वय ५५, रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्या तीन साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे़ ही घटना न्यू मोदीखाना मस्जिदजवळ मंगळवारी १० मार्च रोजी रात्री सव्वा दहा वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैसल खान हा इतरांबरोबर न्यू मोदीखाना मस्जिदजवळ गप्पा मारत उभा होता. दुचाकीवरुन आरोपी जात असताना फैसल याने शब्ब्या अशी एकाला हाक मारली. चेष्टा मस्करीत मारलेल्या हाकेमुळे दुचाकीवरील तिघे जण फैसल जवळ आले. त्यांनी तु अशी हाक का मारली, अशी विचारणा केली. त्यातून त्यांच्यात वाद झाला. तेव्हा त्यांनी फोन करुन आणखी एकाला बोलावून घेतले. तो चाकू घेऊन आला. त्यांनी फैसलला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्यानंतर त्याच्यावर चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. फैसल याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले. परंतु, अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. लष्कर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस तपास करीत आहेत. 

Web Title : छेड़छाड़ से हत्या; पुणे कैंप क्षेत्र में तीन गिरफ्तार।

Web Summary : पुणे के कैंप इलाके में मजाक-मस्ती के बाद हुए विवाद में एक युवक की हत्या कर दी गई। लष्कर पुलिस ने अपराध के लिए तीन लोगों को गिरफ्तार किया है, जिसमें पीड़ित को चाकू मारना शामिल है। आंतरिक रक्तस्राव से मौत हो गई।

Web Title : Teasing leads to murder; three arrested in Pune camp area.

Web Summary : A young man was murdered in Pune's Camp area following an argument stemming from playful teasing. Three individuals have been arrested by Lashkar police for the crime, which involved stabbing the victim. Internal bleeding caused the death.