पुणे : वैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव भागात घडली. या प्रकरणी चार जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विशाल शिवाजी शेळके (वय २६, रा. भोलेनगर, आंबेगाव खुर्द) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
या प्रकरणी सादर शेख (वय १९), राजप्पा यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शेळके याने आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेळके याची आराेपींशी भांडणे झाली होती.
२६ मार्च रोजी तो आंबेगावमधील भीमाई चौकातून मित्रासोबत निघाला होता. त्या वेळी आरोपींनी शेळके आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्राला अडवले. दोघांना शिवीगाळ केली. आरोपींनी शेळके याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलिस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे पुढील तपास करत आहेत.
Web Summary : A youth was attacked with a sharp weapon in Ambegaon, Pune, due to a prior dispute. Police have registered a case of attempted murder against four individuals. The victim, Vishal Shelke, was assaulted on March 26th. Police are searching for the absconding suspects.
Web Summary : पुणे के आंबेगांव में पुराने विवाद के चलते एक युवक पर धारदार हथियार से हमला किया गया। पुलिस ने चार लोगों के खिलाफ हत्या के प्रयास का मामला दर्ज किया है। घायल विशाल शेल्के पर 26 मार्च को हमला हुआ। पुलिस फरार आरोपियों की तलाश कर रही है।