तरुणाने ब्रेकअपनंतर केले प्रेयसीचे अश्लील फोटो व्हायरल; मैत्रिणीच्या फोटोवर केले नको ते कमेंट अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 17:56 IST2025-03-20T17:55:36+5:302025-03-20T17:56:39+5:30
मैत्रीण आणि आरोपी यांचे प्रेमसंबंध होते. मागील दोन महिन्यांमध्ये त्यांच्यामध्ये अंतर्गत वादावादी झाल्याने ब्रेकअप झाले होते.

तरुणाने ब्रेकअपनंतर केले प्रेयसीचे अश्लील फोटो व्हायरल; मैत्रिणीच्या फोटोवर केले नको ते कमेंट अन्...
लोणी काळभोर - ब्रेकअप झाल्यानंतर प्रेयसीचे अश्लील फोटो तर तिच्या मैत्रिणीच्या फोटोवर अश्लील कमेंट करून सोशल मिडीयावर व्हायरल केल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर परिसरात घडली असून याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकावर सोमवारी (दि. १७) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांत उमाकांत कोळी (रा. मांजरी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत ही लोणी काळभोर परिसरातील एका नामांकित शैक्षणिक संकुलात व्यावसायिक शिक्षण घेत आहे. तर तिची मैत्रीणही त्याच संकुलात शिक्षण घेत आहे. दोघीही लोणी काळभोर परिसरात पिजीमध्ये राहतात.
दरम्यान, फिर्यादी यांची मैत्रीण आणि आरोपी यांचे प्रेमसंबंध होते. मागील दोन महिन्यांमध्ये त्यांच्यामध्ये अंतर्गत वादावादी झाल्याने ब्रेकअप झाले होते. आरोपीला हे ब्रेकअप फिर्यादी यांच्यामुळे झाल्याचा संशय होता.आरोपी हा फिर्यादी यांच्या मैत्रिणीसोबत पुन्हा प्रेमसंबंध प्रस्तापित करण्यासाठी प्रयत्न करीत होता. मात्र काहीही केले तरी त्याची प्रेयसी प्रेमसंबंध ठेवण्यास नकार देत होती.
याचाच राग मनात धरून आरोपीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंट फिर्यादीचा फोटो ठेवुन त्याखाली अश्लील कमेंट केली. तसेच फिर्यादी व फिर्यादीची मैत्रिण यांची नावे टाकुन अश्लील कमेंट केलेली स्टोरी ठेवुन पोस्ट व्हायरल केली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या व्हॉटसअॅप नंबर वर फिर्यादी यांच्या मैत्रिणीचे अश्लील फोटो टाकुन फिर्यादीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन त्यांचा विनयभंग केला आहे. अशी फिर्याद लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी एका २१ वर्षीय विद्यार्थिनीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.