माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का करतेस? येरवड्यात बॉयफ्रेंडवरून मुलींमध्ये तुफान राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 19:42 IST2025-08-23T19:29:51+5:302025-08-23T19:42:02+5:30
पुणे - माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का करतेस? या किरकोळ कारणावरून येरवड्यातील नेताजी शाळा परिसरात रात्री उशिरा दोन मुलींच्या टोळ्या एकमेकांशी ...

माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का करतेस? येरवड्यात बॉयफ्रेंडवरून मुलींमध्ये तुफान राडा
पुणे - माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का करतेस? या किरकोळ कारणावरून येरवड्यातील नेताजी शाळा परिसरात रात्री उशिरा दोन मुलींच्या टोळ्या एकमेकांशी भिडल्या. या दरम्यानचा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साधारण १०.३० च्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
हा व्हिडिओ येरवड्या परिसरातील एका शाळेच्या आवारातील आहे. भांडणात मारहाण, लाथाबुक्या, केस ओढणे, अश्लील शिवीगाळ अशा घाणेरड्या प्रकारांचा पाढाच वाचला गेला. पाहता पाहता परिसरात गर्दी झाली. मुलींची ही भांडण पाहून स्थानिक नागरिक अवाक् झाले. सध्या हा व्हिडिओ सोशल चांगलाच चर्चेत आला असून यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.
या प्रकाराने केवळ उपस्थित लोकांनाच धक्का बसला नाही, तर मुलींच्या निर्लज्ज वागणुकीमुळे पालकांची बेपर्वाई उघड झाल्याची चर्चा सुरू आहे. शिक्षण, संस्कार आणि शिस्त यांचा बोजवारा उडाल्याचं चित्र या भांडणातून दिसून आलं. या गोंधळामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी यांना धडा शिकवावा अशी मागणी केली जात आहे. येरवडा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत पुढील कारवाई सुरू केली आहे.