Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 13:00 IST2025-09-25T12:58:51+5:302025-09-25T13:00:44+5:30
Pune Latest News: पुण्यातील ससून रुग्णालयात एक भयंकर घटना घडली आहे. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णाने ११व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
Pune news in marathi: नेहमी वर्दळ असणाऱ्या पुण्यातील ससून रुग्णालयात धक्कादायक घटना घडली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णाने ससून रुग्णालयाच्या ११व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. विजय असे त्याचे नाव आहे. त्याने यापूर्वी पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वे समोरही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील ससून रुग्णालयात विजय दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, गुरुवारी (२५ सप्टेंबर) त्याने ११व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
२० दिवसांपूर्वी रेल्वेसमोर मारली होती उडी
विजय हा मनोरुग्ण असून, त्याने यापूर्वीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. २० दिवसांपूर्वी म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी त्याने रेल्वे समोर उडी मारली होती. आत्महत्येच्या प्रयत्नात असतानाच त्याला रेल्वे पोलिसांनी खेचले.
त्यानंतर त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात आणण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू होते. एका वार्डामध्ये तो होता. गुरुवारी (२५ सप्टेंबर) त्याने ११ व्या मजल्यावरून उडी मारली. जागेवरच त्याचा मृत्यू झाला.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेने रुग्णालयात खळबळ उडाली होती.