Video : लग्नाच्या पाच दिवस आधी तरुणीचे अपहरण; नागरिक संतप्त, भिगवण बंदची हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 10:00 IST2026-02-18T09:50:01+5:302026-02-18T10:00:09+5:30

- आईसोबत दुचाकीवरून जात असताना दोन युवकांनी आई व भावाच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून २१ वर्षीय तरुणीचे अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे.

pune crime Video young woman kidnapped before marriage in Bhigwan; Citizens angry, call for Bhigwan bandh | Video : लग्नाच्या पाच दिवस आधी तरुणीचे अपहरण; नागरिक संतप्त, भिगवण बंदची हाक

Video : लग्नाच्या पाच दिवस आधी तरुणीचे अपहरण; नागरिक संतप्त, भिगवण बंदची हाक

भिगवण (ता. दौंड) -  भिगवण परिसरात मंगळवारी (दि.१७) दुपारी सुमारे चारच्या सुमारास धक्कादायक अपहरणाची घटना घडली. आईसोबत दुचाकीवरून जात असताना दोन युवकांनी आई व भावाच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून २१ वर्षीय तरुणीचे अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

या प्रकरणी दोन सख्या भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींची नावे जाहीर हारून शेख व आयान हारून शेख (रा. शेख वस्ती, स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे) अशी आहेत. गणेश बिरादार, अप्पर पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषदेत माहिती देत आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केल्याचे सांगितले.
 
लग्नाच्या पाच दिवस आधी अपहरण
अपहरण झालेल्या तरुणीचे पाच दिवसांवर लग्न ठरले होते. आरोपी व तरुणी एकाच वस्तीतील असल्याने अपहरणामागील हेतू स्पष्ट झालेला नाही. भिगवण पोलीस स्टेशन कडून सखोल तपास सुरू असून परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

रास्ता रोको आंदोलन, गावात तणाव
घटनेनंतर संतप्त नागरिकांनी मंगळवारी रात्री सुमारे १० वाजता पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग वर काही काळ रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, हिंदू राष्ट्र संघटना व स्थानिक युवकांनी पोलिस ठाण्यात गर्दी केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. बुधवारी (दि.१८) भिगवण बंदची हाक देण्यात आली आहे.


 
पोलीस तपास वेगात
पोलीसांनी आरोपींच्या अटकेसाठी विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू केली असून सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन यांचा आधार घेत तपास सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

Web Title : पुणे: भिगवन में शादी से पहले दुल्हन का अपहरण; नागरिकों का विरोध, बंद का आह्वान।

Web Summary : भिगवन में शादी से पहले 21 वर्षीय युवती का अपहरण कर लिया गया। दो भाइयों पर आरोप है। विरोध प्रदर्शन शुरू हो गया है, और बंद का आह्वान किया गया है। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Pune: Bride-to-be kidnapped in Bhigwan; citizens protest, call for bandh.

Web Summary : A 21-year-old woman was kidnapped in Bhigwan before her wedding. Two brothers are accused. Protests erupted, and a bandh has been called. Police are investigating.