वडगाव आमच्या भाईचं..! लघुशंका करणाऱ्या तरुणाला हटकल्याने धमकी देत दाम्पत्यावर केला कोयत्याने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 12:29 IST2025-03-11T12:27:44+5:302025-03-11T12:29:42+5:30

आम्ही ए डी भाईची मुले आहोत. मला अडवणार काय, आज तुझी विकेटच टाकतो, असे बोलून पतीच्या डोक्यात कोयत्याने वार केला

pune crime Vadgaon belongs to our brother A couple was attacked by a coyote after they were caught urinating | वडगाव आमच्या भाईचं..! लघुशंका करणाऱ्या तरुणाला हटकल्याने धमकी देत दाम्पत्यावर केला कोयत्याने हल्ला

वडगाव आमच्या भाईचं..! लघुशंका करणाऱ्या तरुणाला हटकल्याने धमकी देत दाम्पत्यावर केला कोयत्याने हल्ला

पुणे -धायरी भागात किरकोळ कारणावरून तिघा तरुणांनी पती-पत्नीवर कोयत्याने हल्ला करत जीवघेणा मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्या तरुणाला हटकल्याने संतप्त झालेल्या हल्लेखोरांनी महिलेच्या डोक्यात कोयत्याने वार केला आणि पतीला ठार मारण्याचा प्रयत्न केला.

ही घटना सिंहगड रस्ता परिसरातील हिंगणे खुर्द, महादेवनगर येथे शुक्रवारी रात्री घडली. ३७ वर्षीय महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

नेमकं काय घडले

तक्रारदार महिला आणि तिचे पती शुक्रवारी संध्याकाळी कामावरून घरी परतत असताना सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयासमोर कट्ट्यावर बसले होते. त्याचवेळी दुचाकीवरून तिघे तरुण आले आणि त्यातील एक जण कट्ट्याच्या जवळच उभा राहून लघुशंका करू लागला.  

महिलेच्या पतीने त्या तरुणाला समज दिली, यावरून वाद सुरू झाला. हल्लेखोरांनी पतीला पकडून आम्ही येथेच लघवी करणार, आम्ही ए डी भाईची मुले आहोत. मला अडवणार काय, आज तुझी विकेटच टाकतो, वडगाव आमच्या भाईचं आहे, आम्ही येथेच लघवी करणार, कोण आम्हाला अडवतो?" असे धमकावले आणि शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर एका हल्लेखोराने महिलेच्या डोक्यात कोयत्याने जोरदार वार केला, तर दुसऱ्याने तिच्या पतीच्या डोक्यावर हल्ला करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत सिंहगड रस्ता परिसरातील हिंगणे खुर्द येथील महादेवनगर येथे राहणार्‍या ३७ वर्षाच्या महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांची तत्परता, आरोपींचा शोध सुरू

हल्ल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला आणि नागरिकांची गर्दी पाहून हल्लेखोर कोयते हवेत फिरवत पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे आणि अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.  

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: pune crime Vadgaon belongs to our brother A couple was attacked by a coyote after they were caught urinating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.