Pune Crime : माझी पॉवर वापरून नोकरी...; पुण्यात मद्यधुंद तरुणीने महिला उपनिरीक्षकाला घेतला चावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 09:41 IST2026-03-06T09:41:00+5:302026-03-06T09:41:15+5:30

- पोलिस उपनिरीक्षक व पोलिस अंमलदार यांना ‘मी कोण आहे, ते तुम्हाला दाखवून देतो व माझी पाॅवर वापरून तुमची नोकरी घालवतो,’ अशी धमकी दिली.

Pune Crime Using my power to get a job Woman bitten by hand while touching the uniform of a sub-inspector at a police station | Pune Crime : माझी पॉवर वापरून नोकरी...; पुण्यात मद्यधुंद तरुणीने महिला उपनिरीक्षकाला घेतला चावा

Pune Crime : माझी पॉवर वापरून नोकरी...; पुण्यात मद्यधुंद तरुणीने महिला उपनिरीक्षकाला घेतला चावा

पुणे : बालेवाडी येथील एजंट जॅक या बारमध्ये मारहाण झाल्याचे सांगून बारमध्ये तसेच पोलिस ठाण्यात दारूच्या नशेत तरुण-तरुणीने गोंधळ घातला. महिला पोलिस उपनिरीक्षकाने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या युनिफॉर्मला हात घालून हाताला चावा घेतला. बाणेर पोलिसांनी दारूच्या नशेत गोंधळ घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मानसी चंपलाल परिहार्या (२४, रा. जरवरी सोसायटी, पिंपळे सौदागर) आणि युवराज नीलेश परतानी (२४, रा. डीएसके विद्यानगरी, पाषाण सुस रोड, पाषाण) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत महिला पोलिस उपनिरीक्षकांनी बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार बालेवाडी येथील एजंट जॅक बार आणि बाणेर पोलिस ठाण्यात ३ मार्चला रात्री पावणेबारा ते ४ मार्च पहाटे साडेपाच वाजेपर्यंत सुरू होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसी परिहार्या ही विद्यार्थिनी आहे. युवराज परतानी हा मूळचा हरियाणा येथील राहणारा असून पुण्यात नोकरी करतो. हे दोघे एजंट जॅक येथे ३ मार्चला रात्री पार्टीसाठी गेले होते. त्यांनी दारू पिल्यानंतर दोघांना कोणीतरी मारहाण केली. त्यावरून त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिस नियंत्रण कक्षाला रात्री भांडणाचा प्रकार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मार्शल तसेच बाणेर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षक एजंट जॅक्समध्ये पोहोचले. त्यावेळी मानसी व तिचा मित्र युवराज परतानी हे गोंधळ घालत असल्याचे दिसले. महिला पोलिस उपनिरीक्षक यांनी विचारल्यावर मानसी हिने आम्हाला मारहाण झाली असून, मला हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज आताच पाहिजे आहे, असे ती म्हणत होती.

हॉटेल मॅनेजर यांनी हॉटेलमधील सीसीटीव्हीचे कंट्रोल मुंबईला आहे, उद्या सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून तुम्हाला देण्यात येईल, असे सांगितले तरीही मद्यधुंद असलेले मानसी व युवराज हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांना बाणेर पोलिस ठाण्यात येऊन तक्रार देण्यास सांगितले. त्यावेळी दोघांनी पोलिसांना शिवीगाळ केली. मी कोण आहे, तुम्हाला दाखवून देते, अशी धमकी दिली. या घटनेनंतर पोलिस त्या दोघांना घेऊन बाणेर पोलिस ठाण्यात आले.

पोलिसांनी त्यांना सरकारी हॉस्पिटल येथे वैद्यकीय उपचार करण्याबाबत सांगून वैद्यकीय यादी दिली होती तरीही दोघांनी बाणेर पोलिस ठाण्यात विनाकारण गोंधळ घातला. यावेळी दोघांच्या तोंडाला आंबट व उग्र दारू पिल्याचा वास येत होता, त्यांना उपचारासाठी जाण्यास सांगितल्यावर त्यांनी पोलिसांना शिवीगाळ केली. फिर्यादी महिला पोलिस उपनिरीक्षक यांचा युनिफॉर्म ओढून महिला पोलिस अंमलदार यांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ केली.

युवराज परतानी याने पोलिस उपनिरीक्षक व पोलिस अंमलदार यांना ‘मी कोण आहे, ते तुम्हाला दाखवून देतो व माझी पाॅवर वापरून तुमची नोकरी घालवतो,’ अशी धमकी दिली. तसेच मानसी हिने पोलिसांना शिवीगाळ केली. पोलिसांनी त्यांना मेडिकलसाठी घेऊन जात असताना मानसी हिने महिला अंमलदार यांना ‘तू मला विचारणारी कोण, तू माझ्याशी अशा शब्दांत बोलू नको,’ असे बोलून पुन्हा गोंधळ घातला.

मानसी हिने फिर्यादी यांच्या उजव्या हाताचा चावा घेतला. ‘मी सुसाईड करून बाणेर पोलिस स्टेशन, तुम्हा सर्व पोलिसांची नावे लिहिणार’ असे म्हणून पोलिसांना धमकी दिली. त्यानंतर दोघांनी आम्ही उद्या सकाळी उपचार घेऊन पोलिस ठाण्यात येऊ, असे सांगितले. त्यानंतर ते अजूनपर्यंत परत पोलिस ठाण्यात आलेले नाहीत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाथरे या करत आहेत.

Web Title : पुणे: नशे में धुत युवती ने अधिकारी को काटा, नौकरी छीनने की धमकी

Web Summary : पुणे में एक नशे में धुत युवती और उसके दोस्त ने पुलिस के साथ मारपीट की। युवती ने एक अधिकारी को काटा और अपनी 'शक्ति' का उपयोग करके उसे नौकरी से निकालने की धमकी दी। दोनों पर पुलिस के काम में बाधा डालने का आरोप है।

Web Title : Drunk woman bites officer, threatens job loss in Pune

Web Summary : A drunk woman and her friend created chaos in Pune, assaulting police. The woman bit an officer and threatened to use her 'power' to get her fired. Both are charged with obstructing police duties.