Pune Crime: ‘कुरकुरे देतो, म्हणत नेले अन् ...'; पुणे स्टेशन परिसरात चिमुकलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 14:43 IST2026-02-22T14:41:57+5:302026-02-22T14:43:07+5:30

पुणे स्टेशन परिसरात ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; नराधम आरोपी अटकेत

Pune Crime Uncle gives me crackers and took me to a small child Shocking incident at Pune railway station | Pune Crime: ‘कुरकुरे देतो, म्हणत नेले अन् ...'; पुणे स्टेशन परिसरात चिमुकलीवर अत्याचार

Pune Crime: ‘कुरकुरे देतो, म्हणत नेले अन् ...'; पुणे स्टेशन परिसरात चिमुकलीवर अत्याचार

पुणे :पुणे रेल्वे स्टेशन परिसरात चार वर्षांच्या चिमुकलीला पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले की, मध्य प्रदेशातील खंडवा येथील कुटुंब ऊसतोडणीचे काम आटोपून गावी परतण्यासाठी दि.१६ फेब्रुवारी रोजी रात्री पुणे रेल्वेस्थानकावर आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी असल्याने ते कुटुंब फलाट क्रमांक ३ वर झोपले होते. आरोपी हा त्यांच्याच शेजारी बसून प्रवास करत होता व गाडीत सामान उतरवताना मदतही करत होता. दरम्यान, दि. १७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास पीडितेचे वडील बाथरूमसाठी उठले असता मुलगी जागेवर दिसली नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र ती न सापडल्याने त्यांनी तत्काळ लोहमार्ग पोलिसांकडे धाव घेतली.

लोहमार्ग पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता एक व्यक्ती बालिकेला हात धरून प्लॅटफॉर्मच्या टोकाकडे नेताना दिसला. त्यानंतर जीआरपी व आरपीएफ पथकांनी रेल्वे परिसरात शोध मोहीम राबवून आरोपीसह बालिकेला ताब्यात घेतले. बालिकेने पोलिसांना सांगितले की, ‘काका कुरकुरे देतो’ असे सांगून तिला घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला. तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळून आले, तसेच तिने पोटदुखीची तक्रार केली. त्यानंतर तिची तत्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आईच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात पळवून नेणे व लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

मुलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन

रेल्वेस्थानक परिसरात वाढत्या प्रवाशांच्या गर्दीत लहान मुलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद खोपीकर यांनी केले आहे.

Web Title : पुणे: रेलवे स्टेशन पर नाबालिग लड़की से दुष्कर्म; आरोपी गिरफ्तार

Web Summary : पुणे रेलवे स्टेशन पर एक चार वर्षीय लड़की को कैंडी का लालच देकर यौन उत्पीड़न किया गया। सीसीटीवी जांच और तलाशी अभियान के बाद पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया। बच्ची ने दुर्व्यवहार की सूचना दी और चोट के लक्षण दिखाए।

Web Title : Pune: Minor Girl Abused at Railway Station; Accused Arrested

Web Summary : A four-year-old girl was sexually assaulted at Pune railway station after being lured with candy. Police arrested the accused following a CCTV investigation and a search operation. The child reported the abuse and showed signs of injury.