“नातेवाईकांकडून खोटे आरोप…” गर्भवती मृत्यू प्रकरणात रुग्णालय प्रशासनाची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 21:11 IST2025-04-03T21:10:39+5:302025-04-03T21:11:09+5:30
- पैसे भरले नाहीत म्हणून उपचार नाकारले? पुण्यात गर्भवतीच्या मृत्यूने खळबळ

“नातेवाईकांकडून खोटे आरोप…” गर्भवती मृत्यू प्रकरणात रुग्णालय प्रशासनाची भूमिका
पुणे : शहरातील एका नामांकित रुग्णालयाच्या पैशाच्या हव्यासाने एका गर्भवती तरुणीला जीव गमावावा लागला असल्याची धक्कादायक घटना सुसंस्कृत पुण्यात घडली आहे. पैशांअभावी गर्भवतीला वेळीच उपचार मिळाले नाही. हॉस्पिटलने गेटवरूनच परत पाठविल्याने ऐन वेळी ॲम्ब्युलन्सही मिळाली नाही. तीव्र प्रसूती वेदना होत असताना वेळीच खाजगी गाडीने २५ किलोमीटवरील रुग्णालयात गर्भवतीला नेण्यात आलं. तिनं जुळ्या मुलींना जन्म दिला मात्र वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने तिची तब्येत खालावली.
तिला पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितलं. मात्र त्या रुग्णालयात दाखल करताच तिचा मृत्यू झाला. जर वेळीच उपचार मिळाले असते तर गर्भवतीचा जीव वाचला असता. जन्मताच दोन नवजात बाळांवर मातृछत्र गमावण्याची वेळ आली नसती शा शब्दांत पुण्यात त्या रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्विय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांना प्रसूती वेदना होत होत्या. सुशांत यांनी पत्नीला पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेलं होतं. त्यावेळी त्यांच्याकडे १० लाखांची मागणी करण्यात आली. त्यावर अडीच लाख रुपये आता तातडीने भरतो. उपचार सुरू करा अशी विनंती सुशांत यांनी केली. पण रुग्णालयाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. गर्भवतीची तब्येतही खालावल्याने जीव गमवावा लागला आहे.
उपचाराऐवजी आधी पैसे भरण्याची अट? गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर रुग्णालयावर गंभीर आरोप
— Lokmat (@lokmat) April 3, 2025
पुणे - पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर रुग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. २९ मार्च रोजी झालेल्या या दुर्दैवी घटनेत तनिषा भिसे (वय २७)… pic.twitter.com/pbfZUPxAtZ
त्याच वेळी काही मंत्री आमदार यांनीही रुग्णालय प्रशासनाला फोन केले. प्रसूती वेदना वाढत असल्याने नाईलाजाने सुशांत यांनी वाकड येथील सूर्या हॉस्पिटलमध्ये तनिषा यांना नेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तातडीने ॲम्ब्युलन्सही उपल्बध झाली नाही. शेवटी खाजगी गाडीनेच त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. सूर्या हॉस्पिटलमध्ये त्यांची सिझेरीन द्वारे प्रसुती झाली. तनिषा यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र त्यांची तब्येत ढासळल्याने त्यांना दुस-या रुग्नालयामध्ये सांगण्यात आले. त्यानुसार जवळच्या मणिपाल रुग्णालयात तनिषा यांना दाखल करण्यात आले. तोपर्यंत फार उशीर झाला होता. योग्य उपचार वेळीच न मिळाल्या मुळे तनिषा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप गर्भवतीचे पती या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांसहपुणे शहर हादरून गेले आहे. सुशांत भिसे यांनी केला आहे.
एकीकडे दोन दोन लेकींच्या जन्माचा आनंद असताना दुसरीकडे त्यांनी जन्मताच आई गमावल्याची घटना हृदयद्रावक आहे. भिसे कुटंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. दीनानाथ सारख्या नामांकित रुग्णालयाने पैशा पेक्षा माणूसकी जपली असती तर दोन लहान लेकी आज आई पासून वंचित राहिल्या नसत्या. तनिषा भिसे यांचा जीव वाचला असता. पण मंगेशकर रुग्णालयाने माणूसकी ऐवजी पैशाला जास्त महत्व दिलं. त्यामुळे एका तरुण आईचा जीव गेला आहे यामुळे पुण्यात संतापाची लाट उसळली आहे.
गर्भवतीची शारिरिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती. नातेवाईकांकडून खोटे व चूकीचे आरोप केले गेले आहेत. त्या संदभार्तचा अहवाल आम्ही राज्य सरकारला सादर केला आहे. मीडियात सध्या बातम्या येत आहेत त्या अर्धवट आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे
- डॉ. धनंजय केळकर, संचालक दीनानाथ मंगेशकर रुग्णालय