हॅलो इन्स्पेक्टर : घराच्या दरवाजावर कोरलेले 'सनी' नाव दिसले; पोलिसांना क्लू मिळाला अन्...

By नितीश गोवंडे | Updated: June 12, 2025 11:19 IST2025-06-12T11:07:45+5:302025-06-12T11:19:36+5:30

मांजरी परिसरातील शेतातील विहिरीत आढळला चेहरा नसलेला मृतदेह; कोणताही पुरावा नसताना हडपसर पोलिसांनी उलगडले खुनाचे गूढ, सोशल मीडियावर तपासल्या प्रोफाइल

pune crime the name 'Sunny' was found carved on the door of the house and the police got a clue. | हॅलो इन्स्पेक्टर : घराच्या दरवाजावर कोरलेले 'सनी' नाव दिसले; पोलिसांना क्लू मिळाला अन्...

हॅलो इन्स्पेक्टर : घराच्या दरवाजावर कोरलेले 'सनी' नाव दिसले; पोलिसांना क्लू मिळाला अन्...

पुणे : मांजरी परिसरातील एका शेतातील विहिरीत चेहरा नसलेला मृतदेह सापडल्याची माहिती जून २०१६ मध्ये हडपसर पोलिसांना मिळाली. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक संदीप देशमाने हे त्यावेळी डीबी पथकाचे प्रमुख होते. त्यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. चेहऱ्यावर मांस नाही, केवळ हाडे, अंगात हिरव्या-पांढऱ्या रंगाचा चौकडी शर्ट आणि पॅट असलेला मृतदेह त्यांनी बघितला.

पाण्यामुळे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. मृतदेहाच्या पँटच्या खिशात पीएमपी बसचा अर्धा पास त्यांना सापडला. त्यावर सनी रॉय एवढेच लिहिलेले होते. त्याव्यतिरिक्त कोणतीही खूण नव्हती. २५ ते ३० वयोगटातील हा मृतदेह होता. दिवस-रात्र १० दिवस तपास केल्यानंतर अखेर या खुनाचा उलगडा झाला.

सोशल मीडियावर शोध 

सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी अथवा कोणताही तांत्रिक पुरावा नसल्याने पोलिसांना हा मृतदेह नेमका कुणाचा आहे, त्याच्या घरी याबाबत कल्पना आहे का? याचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली. ४ ते ५ दिवस सोशल मीडियावर सनी रॉय नावाची प्रोफाइल तपासल्या. पाचव्या दिवशी सनी रॉय नावाच्या एका व्यक्तीच्या प्रोफाइलवर मिळताजुळता शर्ट असलेला फोटो आढळला. हडपसर परिसरात राहणाऱ्या एकाचे प्रोफाइल पोलिसांना सापडले. त्या व्यक्तीला अखेर पोलिसांनी शोधून काढले.

रूममधील चारही मुलाची केली कसून चौकशी 

पोलिसांनी रूममधील मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सनी हा पीओपीची कामे करत होता. सनी रॉय व त्याच्या एका मित्राचे काही दिवसांपूर्वी भांडण झाल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार त्या मित्राला पोलिसांना ताब्यात घेतले. तो सनीच्या रूममध्येच राहत होता. सुरुवातीचे दोघे व रूममधील दोघांना सनीने घर बांधण्यासाठी काही पैसे बँकेत ठेवल्याचे माहीत होते.

७-८ दिवसांपूर्वी सनी गेला होता यूपीला मूळगावी 

त्या घरामध्ये पोलिसांनी प्रवेश केल्यावर आणखी एक व्यक्ती पोलिसांना आढळली. पोलिसांनी विचारपूस केली असता सनी हा ७-८ दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश येथील त्याच्च्या मूळगावी गेला असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी रूममधील सर्व सामानाची, बॅगची तपासणी केली असता त्यांना पीएमपीचा एक अर्धा पास सापडला. तो पास आणि मृत सनीच्या खिशात मिळालेला अर्धवट पाससोबत जुळला.

काळेपडळ येथे घराच्या दरवाज्यावर 'सनी' नाव

पोलिसांनी सोशल मीडियावरून शोधलेल्या व्यक्तीला सनी रॉयबद्दल विचारणा केली असता, त्याने मध्यस्थीमार्फत एकदा सनीला भेटल्याचे सांगितले. ती दुसरी व्यक्ती पोलिसांना काळेपडळ येथील एका छोटेखानी घराजवळ घेऊन गेली. या घराच्या लाकडी दरवाजावर 'सनी' नाव कोरलेले दिसले आणि पोलिसांना अनोळखी मृतदेहाबाबत ओळख पटण्याचा आशेचा किरण दिसला.

प्रदेश येथील त्याच्या मूळगावी गेला असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी रूममधील सर्व सामानाची, बॅगची तपासणी केली असता त्यांना पीएमपीचा एक अर्धा पास सापडला. तो पास आणि मृत सनीच्या खिशात मिळालेला अर्धवट पाससोबत जुळला.

पैशांसाठी पार्टीला शेतात नेत साधला डाव

 चौघांनी सनीकडे असणारे पैसे हडपण्याची योजना आखली. त्यांनी एका पार्टीचे आयोजन केले. सनीला घेऊन ते मांजरी परिसरातील एका शेतात घेऊन गेले. तेथे त्यांनी पार्टी केली. त्यानंतर सनीकडे बँकेतील पैशांची मागणी केली. सनीने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याला चौघांनी मारहाण केली. या जबरी मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची कबुली आरोपींनी दिली. मारहाणीत सनीचा मृत्यू झाल्याने चौघांनी जवळच असलेल्या विहिरीत सनीचे हात-पाय बांधून त्याला विहिरीत टाकले. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. २-३ दिवसांनी मृतदेह पाण्यावर तरंगायला लागल्याने या खुनाचा उलगडा झाला. 

कोणताही पुरावा नसताना जिद्दीने तपास केला, सर्व कौशल्य पणाला लावले तर अशाप्रकारे अज्ञात मृतदेहाची ओळख पटवून खुनाचा उलगडा होऊ शकतो. वेगवेगळ्या तपास पद्धतींचा अवलंब केल्यास १०० टक्के कोणत्याही अनोखळी मृतहेहाची ओळख पटते, गुन्हा निष्पन्न होतो. - संदीप देशमाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोथरूड पोलिस ठाणे

Web Title: pune crime the name 'Sunny' was found carved on the door of the house and the police got a clue.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.