Pune Crime : तीन महिन्यांनंतरही घायवळ बंधू फरार; पुणे पोलिसांचे हात रिकामेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 09:46 IST2026-02-17T09:44:19+5:302026-02-17T09:46:15+5:30

या गुन्ह्यांमधील सहआरोपी सचिन घायवळ हा महाराष्ट्रात असतानादेखील त्याचा सुगावा पोलिसांना लागत नसल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत.

Pune Crime The main accused in the Kothrud attack is still at large; Pune police have empty hands | Pune Crime : तीन महिन्यांनंतरही घायवळ बंधू फरार; पुणे पोलिसांचे हात रिकामेच

Pune Crime : तीन महिन्यांनंतरही घायवळ बंधू फरार; पुणे पोलिसांचे हात रिकामेच

पुणे : विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या घायवळ बंधूंना गेल्या तीन महिन्यांपासून पकडण्यात पुणे पोलिसांना यश मिळालेले नाही. त्यामुळे तपास यंत्रणेसह राजकीय इच्छाशक्तीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कोथरूडमधील दोन तरुणांवर झालेला खुनी हल्ला तसेच, खंडणीच्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी नीलेश घायवळ याचा पासपोर्ट पोलिसांनी रद्द केल्यानंतरही त्याचा माग पोलिसांना लागू शकलेला नाही. तसेच या गुन्ह्यांमधील सहआरोपी सचिन घायवळ हा महाराष्ट्रात असतानादेखील त्याचा सुगावा पोलिसांना लागत नसल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत.

लंडनला पसार झालेला गुंड नीलेश घायवळ याचा पासपोर्ट पोलिसांनी आधीच रद्द केल्याने त्याचा व्हिसादेखील त्याचवेळी आपोआप रद्द झाला होता. त्यामुळे नीलेश घायवळ हा पासपोर्ट रद्द झाल्याच्या काही दिवसांतच देशात दाखल होणे अभिप्रेत होते. मात्र, आता नीलेश लंडनलाच वास्तव्यास आहे की, अन्य देशात फरार झाला आहे, याची माहिती पोलिसांना मिळालेली नाही. आंतराष्ट्रीय पातळीवर एखाद्या गुन्हेगाराला त्याच्या मायदेशात घेऊन यायचे असल्यास वेगवेगळे कायदे, नियम आहेत. त्याअनुषंगाने पुणे पोलिस गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न करत असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे; परंतु अद्याप त्यांना नीलेश घायवळ याला भारतात परत आणण्याच्या दृष्टिकोनातून यश आलेले नाही.

तर नीलेश याचा भाऊ सचिन याच्या शोधासाठी पोलिसांनी पुणे जिल्ह्यासह अहिल्यानगर आणि मराठवाडा पिंजून काढला. महिन्याभरापूर्वी तो जामखेड परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी सापळा रचला. मात्र, स्थानिक नागरिक सचिनची मदत करत असल्याने पोलिसांना गुंगारा देऊन सचिन पसार झाला. एरवी महत्त्वाच्या गुन्ह्यांतील आरोपी

परराज्यात जाऊन तांत्रिक तपासाच्या मदतीने, सूत्रांच्या माहितीच्या आधारे पोलिस लगेच पकडतात, त्यामुळे सचिन घायवळ याला पकडण्यासाठी पोलिसांना एवढा वेळ का लागतो आहे, हा प्रश्न आपसूकच निर्माण होतो. यासह घायवळ बंधूंना कोण्या राजकीय नेत्याचा वरदहस्त आहे किंवा कसे, याबाबत पोलिस वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

कोथरूडमध्ये किरकोळ भांडणातून १७ सप्टेंबर २०२५ ला दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यामध्ये पिस्तूल, चॉपर व अन्य घटक शस्त्रांचा वापर करण्यात आला. मात्र, त्याचकाळात नीलेश विदेशात पसार झाला. त्याचा भाऊ सचिन हा देखील अंडरग्राऊंड झाला. नीलेशचा मुलगा लंडनमध्ये शिक्षण घेतो. त्यामुळे, तो तेथे गेला असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली. त्याच्या प्रत्यार्पणासाठी गृह मंत्रालयाने यापूर्वीच रेड कॉर्नर व ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावली आहे. तसेच, त्याचा नेमका ठावठिकाणा समजण्यासाठी पुणे पोलिसांनी ब्रिटिश उच्चायुक्तांशीही पत्रव्यवहार केला. त्यानंतर, त्याचा लंडनमधील नेमका ठावठिकाणा पोलिसांना समजला. त्याच्या व्हिसाची मुदत गेल्या आठवड्यात (दि. ६) संपली. तसेच यापूर्वी त्याचा पासपोर्टदेखील रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे, तो पुण्यात दाखल होण्याच्या शक्यतेने पोलिसांनी देशातील महत्त्वाच्या विमानतळांवर त्याची माहिती देऊन तेथेच त्याला ताब्यात घेण्याची व्यवस्था केली. मात्र, त्याच्याबाबत नेमकी माहिती अद्यापही पुढे आलेली नाही.

कोथरूडमधील दोन तरुणांवरील हल्ल्याप्रकरणी नीलेश व सचिन या घायवळ बंधूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते दोघे वगळता या गुन्ह्यातील अन्य सहा आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्यावर पोलिसांनी मोकोका कायद्यान्वये कारवाई केली. तत्पूर्वीच सचिन हाही पसार झाला. त्याच्याविरोधात एका महिलेकडून चाळीस लाखांची खंडणी उकळल्याचा तसेच एका बांधकाम व्यावसायिकाकडून दहा फ्लॅट बळकावल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : पुणे: तीन महीने बाद भी गायब घायवल बंधु, पुलिस के हाथ खाली

Web Summary : पुणे पुलिस को तीन महीने बाद भी घायवल बंधुओं को पकड़ने में सफलता नहीं मिली, जिससे जांच और राजनीतिक इच्छाशक्ति पर सवाल उठ रहे हैं। पासपोर्ट रद्द होने के बावजूद नीलेश का पता नहीं चल पाया है। सचिन का ठिकाना भी अज्ञात है, जिससे राजनीतिक संरक्षण की अटकलें तेज हो गई हैं। पुलिस के प्रयास जारी हैं, लेकिन उन्हें न्याय के कटघरे में लाने में सफलता अभी भी दूर है।

Web Title : Pune: Ghaywal Brothers Still Absconding After Three Months, Police Efforts Fail

Web Summary : Pune police haven't caught the Ghaywal brothers after three months, raising questions about investigation and political will. Despite passport cancellation, Nilesh remains untraced. Sachin's whereabouts are also unknown, fueling speculation of political protection. Police efforts continue, but success remains elusive in bringing them to justice.