तडीपार गुंडाची कोयता उगारून दहशत;लष्कर भागातील भोपळे चौकातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 19:48 IST2025-06-03T19:48:00+5:302025-06-03T19:48:34+5:30

गुंड मेनन आणि दुचाकीस्वार महिलेमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. यावेळी त्याने दुचाकी हळू चालव म्हणत महिलेला शिवीगाळ केली. शिवीगाळ का केली

pune crime terror by raising the sickle of a gangster from abroad; Incident at Bhopale Chowk in Lashkar area | तडीपार गुंडाची कोयता उगारून दहशत;लष्कर भागातील भोपळे चौकातील घटना

तडीपार गुंडाची कोयता उगारून दहशत;लष्कर भागातील भोपळे चौकातील घटना

 पुणे : तडीपार गुंडाने कोयता उगारून आणि हवेत फिरवून नागरिक आणि दुकानदारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना लष्कर भागातील भोपळे चौकात घडली आहे. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी तडीपार गुंडाला अटक केली.

मलंग मेनन (वय २९, रा. भीमपुरा, लष्कर), असे पोलिसांनी अटक केलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला रविवारी (१ जून) रात्री दहाच्या सुमारास भोपळे चौकातून दुचाकीवरून जात होती. त्यावेळी शहरातून तडीपार करण्यात आलेला गुंड मेनन आणि दुचाकीस्वार महिलेमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. यावेळी त्याने दुचाकी हळू चालव म्हणत महिलेला शिवीगाळ केली. शिवीगाळ का केली, असा जाब विचारल्यानंतर मेनन याने त्याच्याकडील कोयता दुचाकीस्वार महिलेवर उगारला.

वादावादी सुरू असताना नागरिक आणि दुकानदार तेथे जमा झाले. तेव्हा मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांवर त्याने कोयता उगारून जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, मेनन याला पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, तसेच जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तडीपार केल्यानंतर तो आदेशाचा भंग करून शहरात आल्याचे उघडकीस आले आहे. पोलिस हवालदार बनसोडे तपास करीत आहेत.

Web Title: pune crime terror by raising the sickle of a gangster from abroad; Incident at Bhopale Chowk in Lashkar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.