पुणे : आरोपी बंडू आंदेकर व त्याचा पुतण्या शिवम आंदेकर यांच्या बँक खात्यात तब्बल २१ कोटी ६० लाख रुपये जमा असून, मासळी बाजारातील व्यापाऱ्यांकडून लाटलेल्या खंडणीतून ही रक्कम जमा झाली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्या अनुषंगाने आरोपींना पुणे ‘मकोका’ न्यायालयाने २८ नोव्हेंबरपर्यंत दिलेल्या पोलिस कोठडीत प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे.
याप्रकरणी बंडू ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम उदयकांत आंदेकर यांच्यासह अकरा जणांविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापाऱ्याने याबाबत तक्रार दिली आहे. आंदेकर टोळीने संघटितरीत्या व्यापाऱ्यांकडून २० कोटी रुपयांहून अधिक खंडणी उकळली आहे. जागा उपलब्ध करून देणे किंवा व्यवसायात सहकार्याच्या नावाखाली व्यापाऱ्यांना धमकावून ही खंडणी वसूल करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आरोपी बंडू आंदेकर व शिवम आंदेकरला पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील विलास पटारे यांनी केली.
आरोपींच्या वतीने ॲड. मिथुन चव्हाण आणि ॲड. ए. एस. धीवार यांनी बाजू मांडली. आरोपींना खोटेपणाने या गुन्ह्यात गुंतविले जात असून, पोलिस कोठडी मागण्यासाठी कोणताही आधार नसल्याचा युक्तिवाद ॲड. चव्हाण यांनी केला. दोन्ही बाजू ऐकल्यावर विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी कृष्णा आंदेकर पोलिस कोठडीत असताना त्याची नानापेठ परिसरातून बेकायदेशीर परेड काढण्यात आल्याबाबत बचाव पक्षाचे वकील ॲड. मिथुन चव्हाण यांनी न्यायालयाकडे तक्रार केली. न्यायालयाने बचाव पक्षाच्या तक्रारींची दखल घेत पुणे पोलिसांवर ताशेरे ओढले. पोलिस कोठडीत असलेल्या आरोपींची सार्वजनिक ठिकाणी परेड काढणे कायद्याला अपेक्षित नाही आणि योग्यही नाही. आरोपीची पोलिस कोठडी योग्य उद्देशासाठीच वापरली जावी,' असे निर्देशही न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना दिले.
Web Summary : Bandoo and Shivam Andekar allegedly amassed ₹21.6 crore from extortion. They're under police custody until November 28th, investigated under MCOCA. Allegedly, the Andekar gang extorted over ₹20 crore, prompting a police investigation and court reprimand for an illegal parade of a suspect.
Web Summary : बंडू और शिवम आंदेकर ने कथित तौर पर उगाही से ₹21.6 करोड़ जमा किए। वे 28 नवंबर तक पुलिस हिरासत में हैं, मकोका के तहत जांच की जा रही है। आरोप है कि आंदेकर गिरोह ने ₹20 करोड़ से अधिक की उगाही की, जिसके कारण पुलिस जांच और एक संदिग्ध की अवैध परेड के लिए अदालत की फटकार लगी।