पिस्तुलाचा धाक दाखवून तरुणाची लूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 19:13 IST2025-05-20T19:12:24+5:302025-05-20T19:13:18+5:30
चौघेजण गाडीत बसल्यानंतर गाडी मुंबईच्या दिशेने निघाली असताना गाडी मामुर्डी परिसरात आल्यानंतर गिरी यांना पिस्तुलाचा धाक दाखविला.

पिस्तुलाचा धाक दाखवून तरुणाची लूट
पुणे : पिस्तुलाचा धाक दाखवून एका वाहनचालकाला लुटल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर घडली असून वारजे पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात संतोष रामरान गिरी (वय ४१) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गिरी हे कोंढवे धावडे भागात राहायला आहेत. ते कामानिमित्त सोमवारी (१९ मे) पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबईला निघाले होते. वारजे परिसरात चौघांनी त्यांची गाडी अडविली आणि मुंबईला सोडण्याची विनंती केली.
चौघेजण गाडीत बसल्यानंतर गाडी मुंबईच्या दिशेने निघाली असताना गाडी मामुर्डी परिसरात आल्यानंतर गिरी यांना पिस्तुलाचा धाक दाखविला. त्यानंतर त्यांच्याकडील तीन हजारांची रोकड आणि मोबाइल असा मुद्देमाल लुटून नेला. याप्रकरणी गिरी यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिस उपनिरीक्षक संजय नरळे तपास करत आहेत.