Pune Crime : प्रवाशांवरून झालेल्या वादातून रिक्षा चालकाला मारहाण;चौघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 11:22 IST2026-04-04T11:22:29+5:302026-04-04T11:22:49+5:30

रिक्षा चालक पुजारी हे कात्रज परिसरात थांबले होते. त्यावेळी रिक्षात प्रवासी भरण्यावरून त्यांचा आरोपींशी वाद झाला.

Pune Crime Rickshaw driver beaten up over dispute over passengers | Pune Crime : प्रवाशांवरून झालेल्या वादातून रिक्षा चालकाला मारहाण;चौघांविरोधात गुन्हा दाखल

Pune Crime : प्रवाशांवरून झालेल्या वादातून रिक्षा चालकाला मारहाण;चौघांविरोधात गुन्हा दाखल

पुणे : प्रवाशांवरून झालेल्या वादातून रिक्षा चालकाला मारहाण करून त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालण्यात आला. कात्रज परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी दोन रिक्षा चालकांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शेखर गोविंद पुजारी (वय ४९, रा. घुंगरवाली चाळ, संतोषनगर, कात्रज) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी कुणाल कांबळे (रा. बिबवेवाडी), एस. मिसाळ ऊर्फ टायगर यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुजारी यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा चालक पुजारी हे कात्रज परिसरात थांबले होते. त्यावेळी रिक्षात प्रवासी भरण्यावरून त्यांचा आरोपींशी वाद झाला. वादातून आरोपींनी पुजारी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. रस्त्यात पडलेला सिमेंटचा गट्टू पुजारी यांच्या डोक्यात घातला. पुजारी गंभीर जखमी झाले. सहायक फौजदार रवींद्र भाेसले तपास करत आहेत.

 औंध परिसरात हाणामारी; टोळक्याविरोधात गुन्हा...

नृत्य करताना झालेल्या वादातून टोळक्याने चौघांना मारहाण केल्याची घटना औंधमधील इंदिरा गांधी वसाहतीत घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसंनी टाेळक्याविरोधात गुन्हा दाखल केला. याबाबत कुणाल नंदकिशोर तुजारे (वय २२, रा. श्री हनुमान मंदिराजवळ, इंदिरा गांधी वसाहत, औंध) याने फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रमोद घडसिंग, समीर घडसिंग, भय्या सरोदे, तेजस देवकर, ओंकार पाटोळे (सर्व रा. इंदिरा गांधी वसाहत, औंध) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल तुजारे याचे वडील बुधवारी (दि. १) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास इंदिरा गांधी वसाहतीतील एका सार्वजनिक कार्यक्रमात नृत्य करत होते. साउंड स्पीकरवर गाणी लावण्यात आली होती. त्यावेळी नाचताना आरोपी घडसिंग याला कुणालच्या वडिलांचा धक्का लागला. या कारणावरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी कुणालचे वडील नंदकिशोर यांना मारहाण केली. कुणाल आणि त्याचा पुतण्या आरोपींना जाब विचारण्यास गेले. तेव्हा टोळक्याने त्यांनाही मारहाण केली. पोलिस हवालदार गायकवाड पुढील तपास करत आहेत.

Web Title : पुणे: यात्रियों को लेकर ऑटो चालक की पिटाई; चार के खिलाफ मामला दर्ज।

Web Summary : पुणे में यात्रियों के विवाद में एक ऑटो चालक पर सीमेंट के ब्लॉक से हमला किया गया। चार लोगों पर मामला दर्ज। अलग से, औंध में नृत्य विवाद पर एक समूह ने चार लोगों पर हमला किया, जिससे एक और पुलिस मामला दर्ज हुआ।

Web Title : Pune: Auto driver assaulted over passengers; case filed against four.

Web Summary : An auto driver was attacked with a cement block in Pune over a passenger dispute. Four are booked. Separately, a group assaulted four in Aundh over a dance disagreement, leading to another police case.