Pune Crime : निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाच्या मुलाला मारहाण; तिघेजण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 18:49 IST2026-02-14T18:47:40+5:302026-02-14T18:49:14+5:30

सर्व आरोपी शिर्के यांच्या मुलाच्या ओळखीतील आहे. त्यांनी शिर्के यांच्या मुलाची दुचाकी न विचारता घेतली.

Pune Crime Retired police sub-inspector's son beaten up; Three arrested | Pune Crime : निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाच्या मुलाला मारहाण; तिघेजण अटकेत

Pune Crime : निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाच्या मुलाला मारहाण; तिघेजण अटकेत

पुणे : दुचाकी न विचारता घेऊन गेल्याने झालेल्या वादातून निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाच्या मुलाला तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना लोहगाव भागात घडली. याप्रकरणी सिद्धार्थ दत्तू जाधव (वय २४), आकाश हरेंद्र शर्मा (२२) आणि गणेश संतोष माने (२५, तिघे रा. लोहगाव) यांना अटक करण्यात आली. याबाबत गोरखनाथ शिर्के (६५, रा. लोहगाव) यांनी लोहगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरखनाथ शिर्के हे पोलिस दलातून निवृत्त झाले आहेत. ते कुटुंबीयांसह लोहगाव भागात राहायला आहेत.  सर्व आरोपी शिर्के यांच्या मुलाच्या ओळखीतील आहे. त्यांनी शिर्के यांच्या मुलाची दुचाकी न विचारता घेतली.

या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. वादातून आरोपींनी शिर्के यांच्या मुलाला दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यात मुलाला गंभीर दुखापत झाली. पसार झालेल्या तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, पोलिस उपनिरीक्षक संतोष शिंदे पुढील तपास करत आहेत.

Web Title : पुणे: सेवानिवृत्त पुलिसकर्मी के बेटे की पिटाई; लोहगांव में तीन गिरफ्तार।

Web Summary : मोटरसाइकिल विवाद में लोहगांव में सेवानिवृत्त पुलिसकर्मी के बेटे की गंभीर पिटाई; तीन गिरफ्तार। हमले में पीड़ित को गंभीर चोटें आईं।

Web Title : Pune: Retired cop's son beaten; three arrested in Lohgaon.

Web Summary : Retired policeman's son severely beaten in Lohgaon over a motorcycle dispute; three arrested. The victim sustained serious injuries in the assault.