Pune Crime : 'पुष्पाभाईं'नी पाषाण येथील एनसीएलच्या आवारातील सात चंदनाची झाडे केली चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 18:05 IST2025-09-01T17:59:48+5:302025-09-01T18:05:31+5:30
एनसीएलच्या आवारात २९ ऑगस्टला रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश करून चंदनाची सात झाडे कापली.

Pune Crime : 'पुष्पाभाईं'नी पाषाण येथील एनसीएलच्या आवारातील सात चंदनाची झाडे केली चोरी
पुणे : पाषाण येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) या संशोधन संस्थेच्या आवारातून चंदनाची सात झाडे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. यावेळी सुरक्षारक्षकांनी दोन जणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, तर दोन चोरटे पसार झाले. बाबू ताया लोखंडे (४९, रा. केडगाव, दौंड), सुरेश पाटोळे (२८, रा. खुटबाव, चाळोबा वस्ती, दौंड) अशी पोलिसांच्या ताब्यात दिलेल्यांची नावे आहेत.
पराग रमेश चिटणवीस (वय ५६, रा. एनसीएल कॉलनी, पाषाण रोड) यांनी चतु:शृंगी पोलिसांत चोरट्यांविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीएलच्या आवारात २९ ऑगस्टला रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश करून चंदनाची सात झाडे कापली.
झाडांचा मधला बुंदा चोरून नेला. यावेळी सुरक्षारक्षकांनी बाबू व सुरेश या दोन पकडून पोलिसांच्या हवाली केले. तर पसार झालेल्या दोघा चोरट्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ निरीक्षक उत्तम भजनावळे, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे आणि तपासी अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.