मौजमजेसाठी वाहने चोरणारे अल्पवयीन पोलिसांच्या जाळ्यात; दुचाकीसह दोन रिक्षा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 19:07 IST2025-08-19T19:07:38+5:302025-08-19T19:07:55+5:30
ही रिक्षा चोरणारा अल्पवयीन वारजे भागातील रामनगर परिसरातील थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी साईकुमार कारके यांना मिळाली होती.

मौजमजेसाठी वाहने चोरणारे अल्पवयीन पोलिसांच्या जाळ्यात; दुचाकीसह दोन रिक्षा जप्त
पुणे : मौजमजेसाठी वाहन चोरणारा अल्पवयीन गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाच्या जाळ्यात अडकला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक दुचाकी आणि दोन रिक्षा जप्त केल्या आहेत. पोलिसांनी ही कारवाई वारजे येथील रामनगर परिसरात केली.
सहकारनगर परिसरातून एक रिक्षा चोरीला गेल्याची तक्रार सहकार नगर पोलिस ठाण्यात नोंद झाली होती. ही रिक्षा चोरणारा अल्पवयीन वारजे भागातील रामनगर परिसरातील थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी साईकुमार कारके यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने रिक्षा चोरल्याची कबुली दिली. त्याने सहकारनगर, वारजे, हडपसर परिसरातून एक दुचाकी, दोन रिक्षा चाेरल्याचेही सांगितले.
ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे, वर्षा कावडे, पोलीस कर्मचारी धनंजय ताजणे, साईकुमार कारके, गणेश ढगे, दत्तात्रय पवार, अजित शिंदे, नारायण बनकर, प्रदीप राढोट, निनाद माने यांच्या पथकाने केली.