स्वारगेट बस स्थानकासमोर पोलीस आणि गांजा तस्करामध्ये थरार;घटना सीसीटीव्ही कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 19:43 IST2025-06-25T19:42:27+5:302025-06-25T19:43:25+5:30
- तब्बल ६ किलो गांजा, दोन मोबाईल फोन आणि एक इंजिनिओ क्रिस्टा कार असा एकूण १६,४५,६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

स्वारगेट बस स्थानकासमोर पोलीस आणि गांजा तस्करामध्ये थरार;घटना सीसीटीव्ही कैद
पुणे - गांजासह इतर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पुणेपोलिसांनी पर्दाफाश केला असून, या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुमारे १६ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून या आरोपीना अटक करतांनाचा व्हिडिओ सध्या सोशल चर्चेत आला आहे. सोलापूर वरून गांजा तस्करी करण्यासाठी पुण्यात आलेल्या तिघांना पोलिसांनी स्वारगेट परिसरात पाठलाग करून पकडले आहे.पोलिस आणि तस्कराचा थरार सीसीटीव्ही कैद झाले आहे.
अधिकच्या माहितीनुसार, ही कारवाई १४ जून २०२५ रोजी सायंकाळी स्वारगेट येथील एस.टी. स्टॅंड परिसरात करण्यात आली. मध्यप्रदेशातून आलेल्या तीन इसमांकडे गांजासह इतर अंमली पदार्थ असून ते पुण्यात विक्रीसाठी आणले जात असल्याची गोपनीय माहिती अंमलदारांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून इस्माल शेख (वय २८), नावेद शेख (वय २३) आणि नवनाथ शिंदे या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल ६ किलो गांजा, दोन मोबाईल फोन आणि एक इंजिनिओ क्रिस्टा कार (MH-09-EJ-3323) असा एकूण १६,४५,६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
नितीन नरसिंह पाल,अल्ताफ तांबोळी आणि विठ्ठल उर्फ दादा शिवपाल या तिघा आरोपींना पोलिसांनी स्विफ्ट कार सह सहा किलो गांजा आणि स्विफ्ट गाडी सह 16 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे, पोलीस निरीक्षक संपतराव राऊत पोलीस आमदार राहुल होळकर, विक्रम सावंत यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.