तुझा प्रमोशन देतो, त्या बदल्यात मला...; महिलेशी अश्लिल वर्तन करणाऱ्या टीम लीडरवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 18:45 IST2025-10-04T18:44:23+5:302025-10-04T18:45:21+5:30

कंपनीचे पार्किंगमध्ये स्वत:च्या कारमध्ये बसवले. तुझे प्रमोशन करतो व तुझा पगार वाढवतो, त्या बदल्यात मला काहीतरी पाहिजे, असे म्हणाला.

pune crime news you increase your salary give me promotion, in return; Case registered against team leader for lewd behavior with woman | तुझा प्रमोशन देतो, त्या बदल्यात मला...; महिलेशी अश्लिल वर्तन करणाऱ्या टीम लीडरवर गुन्हा दाखल

तुझा प्रमोशन देतो, त्या बदल्यात मला...; महिलेशी अश्लिल वर्तन करणाऱ्या टीम लीडरवर गुन्हा दाखल

पुणे : महिलेला स्वत:च्या कारमध्ये बसवून तिला तुझा पगार वाढवतो, प्रमोशन देतो, त्या बदल्यात मला काहीतरी पाहिजे, असे म्हणून महिलेसोबत अश्लील वर्तन करणार्या टीम लिडरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत रिठे (रा. ससाणेनगर, हडपसर)

असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका ३८ वर्षीय महिलेने खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार खराडी येथील एका आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये ३ ऑक्टोबर रोजी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी अनिकेत रिठे हे एकाच आय टी कंपनीत कामाला आहेत. अनिकेत रिठे हा टीम लीडर आहे. कंपनीत असताना पहाटे तीनच्या सुमारास अनिकेत रिठे याने फिर्यादी यांना तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून कंपनीचे पार्किंगमध्ये स्वत:च्या कारमध्ये बसवले. तुझे प्रमोशन करतो व तुझा पगार वाढवतो, त्या बदल्यात मला काहीतरी पाहिजे, असे म्हणाला. त्याला फिर्यादी यांनी नकार दिला असता, त्यांचे चुंबन घेऊन त्यांच्याबरोबर अश्लील वर्तन करुन विनयभंग केला. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मुबारक शेख करत आहेत.

Web Title: pune crime news you increase your salary give me promotion, in return; Case registered against team leader for lewd behavior with woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.