Pune Crime: पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 09:46 IST2025-10-08T09:15:01+5:302025-10-08T09:46:00+5:30
Pune Crime News : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चार तरुण एका घरात घुसून घरातील सदस्यांना तलवारीने मारहाण करत असल्याचे समोर आले आहे.

Pune Crime: पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
Pune Crime News : मागील काही काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. येरवडा परिसरातील लक्ष्मीनगरमध्ये चार तरुणांनी थेट घरात घुसून एका महिलेस आणि तिच्या मुलावर तलवारीने मारहाण केली. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा परिसरातील एका घरात अचानक शिरुन मारहाण केल्याची तक्रार रहीसा महंमद शेख यांनी दिली. जहुर शेख (वय २८), सुलतान खान (वय २०), आझाद खान (वय २२) आणि मुस्तफा खान (वय २१) हे चारही आरोपी रविवारी सकाळी अचानक त्यांच्या घरात घुसले.
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
हे आरोपी अचानक घरात घुसले. आणि म्हणाले, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय 'माझ्या आईला का मारले?', अशा प्रश्न विचारत आरोपी जहूर शेख याने तलवार काढून रहीसा यांच्यावर हल्ला केला. यानंतर त्यांचा मुलगा साजिद शेख याच्यावरही हल्ला केला.
यावेळी इतर आरोपींनी घरात घुसून फर्निचर फोडलं, वस्तूंचं नुकसान केलं आणि गलिच्छ शिवीगाळ करत महिलेला धमक्या दिल्या.अचानक घरातून शिवीगाळ आणि मारहाणीचा आवाज आल्यानतंर गोंधळ उडाला.शेजाऱ्यांनी आरडाओरड ऐकून घटनास्थळी धाव घेतली . रहीसा महंमद शेख या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या.
घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. दोघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी सांगितली.
पोलिसांनी जहुर शेख, सुलतान खान, आझाद खान आणि मुस्तफा खान या चार आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हा नोंदवला आहे. या हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.