Video : व्हायरल वक्तव्य पडले महागात..! वसंत मोरे यांचा जामीन फेटाळला; अटकेची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 12:34 IST2026-03-25T12:31:51+5:302026-03-25T12:34:09+5:30

सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य पडले महागात; वसंत मोरे यांना अटकेची शक्यता

pune crime news viral statement cost money Vasant More's bail rejected Arrest likely | Video : व्हायरल वक्तव्य पडले महागात..! वसंत मोरे यांचा जामीन फेटाळला; अटकेची शक्यता

Video : व्हायरल वक्तव्य पडले महागात..! वसंत मोरे यांचा जामीन फेटाळला; अटकेची शक्यता

पुणे -  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वक्तव्यामुळे वसंत कृष्णाजी मोरे यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने, आता त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ तुकाराम लहाडे (वय ७२) यांच्या तक्रारीनंतर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



अधिकच्या माहितीनुसार, २५ फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिकेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत वसंत मोरे यांनी कथितपणे विश्वनाथ लहाडे यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले. तक्रारीनुसार, लहाडे हे अनुसूचित जातीतील असल्याची माहिती असतानाही जाणीवपूर्वक त्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने वक्तव्य करण्यात आले. या वक्तव्यात “दारू पिऊन बोलू शकत नव्हते” तसेच “ओढ्यात उतरून गटारे साफ करत होते” अशा शब्दांचा वापर केल्याचा आरोप आहे. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

दरम्यान, वसंत मोरे यांनी अटक टाळण्यासाठी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्यामुळे आता पोलिसांकडून पुढील कारवाई वेगाने होण्याची शक्यता आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला असून, संबंधित पुरावे आणि व्हायरल व्हिडिओची पडताळणी केली जात आहे. फिर्यादींच्या मते, या व्हायरल व्हिडिओमुळे त्यांची सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात आली असून कुटुंबावर मानसिक ताण निर्माण झाला आहे. सध्या कुटुंब भीतीच्या वातावरणात असल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.

Web Title : वायरल बयान के बाद वसंत मोरे की जमानत खारिज; गिरफ्तारी की संभावना।

Web Summary : विवादित बयान के बाद वसंत मोरे की अग्रिम जमानत खारिज हो गई है। विश्वनाथ लहाडे के खिलाफ कथित तौर पर अपमानजनक टिप्पणी करने के लिए अत्याचार अधिनियम के तहत शिकायत दर्ज की गई थी। वायरल वीडियो से सामाजिक अशांति और मानसिक पीड़ा हुई है।

Web Title : Vasant More's bail rejected after viral statement; arrest likely.

Web Summary : Vasant More faces arrest after his anticipatory bail was rejected following a complaint under the Atrocity Act for allegedly making derogatory remarks against Vishwanath Lahade at a press conference. The viral video has caused social unrest and mental distress.